म्हणून मला महाभारतातील सुदामा साकारता आला. - सुमित राघवन

सध्या लॉकडाऊनमध्ये सगळेजण घरबसल्या कुटुंबियांसोबत जुन्या पौराणिक मालिका बघत आहेत. रामायण , महाभारत या मालिका सुद्धा आता सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नव्या पिढीलासुद्धा महाभारत आणि रामायण अनुभवायला मिळत आहे.  उत्तर रामायणात जसा आपल्या मराठमोळा अभिनेता व चॉकलेट हिरो स्वप्निल जोशीने बालकलाकार म्हणून कुशची भूमिका साकारली होती, तशीच बी. आर चोप्रांच्या 'महाभारत'मध्ये लाडका अभिनेात सुमित राघवने सुदामा साकारला होता.

 

 

महाभारतमध्ये कृष्णाचा जिवलग सखा साकारण्याची संधी सुमित यांना बालकलाकार म्हणून मिळाली होती. एका वृत्तपत्रासाठी मुलाखत देताना सुमित राघवन म्हणाले की,   "महाभारत ही पौराणिक मालिका इतिहास निर्माण करेल असं तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. मी लहान असल्याने या मालिकेबाबत इतर लहान मुलांसारखाच अभिनय करण्यासाठी खुप म्हणजे खुपच उत्साही होतो. खरंतर त्यावेळेस मी खुप बारीक असल्याने मला ही भूमिका ऑफर झाली होती."

 

 

तसेच  सुमित पुढे सांगतात ,"मला आठवतंय आम्ही फक्त ४-५ दिवसच माझ्या सीनचं म्हणजे सुदाम्याचं शूट केलं होतं. फिल्मसिटीमध्ये माझे हे सिक्वेन्स पार पडले. पावसातले नाचण्याचे सीन्स चेना क्रिक येथे शूट झाले होते. महाभारतात भीष्म  साकारणारे मुकेश खन्ना आणि श्रीकृष्ण साकारणा-या नितिश भारद्वाज यांना स्क्रिनवर मी आजसुध्दा एखाद्या मोठ्या चाहत्यासारखा पाहतो."

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar