५ मराठी चित्रपटांच्या गर्दीत विकेंडला लव यू जिंदगीची कमाई एवढी

LOVE YOU ZINDAGI POSTER
जानेवारी २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ११ जानेवारीला ४ मराठी चित्रपट "लव्ह यु जिंदगी", "नशीबवान", "मुंबई आपली आहे" आणि "फाईट" प्रदर्शित झाले. आणि आधीच्या आठवड्यातील "भाई : व्यक्ति की वल्ली" हा सिनेमादेखील प्रेक्षकांसाठी उपलब्ध होता. एकूणच ५ मराठी चित्रपटांच्या गर्दीत स्क्रीन्स विभागले गेले आणि त्याचा परिणाम चित्रपटांच्या कमाईवर झाला. या व्यतिरिक्त दोन हिंदी सिनेमांनी देखील बर्‍यापैकी स्क्रीन्स राखून ठेवले होते.
 प्रदर्शित झालेल्या चार मराठी चित्रपटांपैकी सर्वाधिक स्क्रीन्स मिळविण्याच्या शर्यतीत 'सचिन पिळगावकर', 'प्रार्थना बेहरे', 'कविता लाड' यांच्या "लव यु जिंदगी" या चित्रपटाने बाजी मारली. सर्वाधिक स्क्रीन्स मिळाल्यामुळे अर्थातच या सिनेमाला जास्त शोज मिळाले आणि म्हणूनच त्याची कमाई बऱ्यापैकी झाली आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या सिनेमाने ६० लाखांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखीन भर करत ८० लाखांचा गल्ला जमवला.

 शनिवारी या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद बघता हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे असेच दिसते. रविवारी देखील या चित्रपटाने शनिवार पेक्षा जास्त कमाई केल्याचे कळते. म्हणजे एकूणत: या सिनेमाची विकेंडची कमाई २.५० कोटींच्या आसपास आहे. "लव यू जिंदगी" सिनेमाने असाच वेग कायम राखल्यास हा सिनेमा लवकरच ५ कोटींचा पल्ला पार करेल असे म्हणण्यास हरकत नाही. तारुण्याची वाख्या बदलून टाकणारा "लव यू जिंदगी" हा सिनेमा तुम्ही देखील सिनेमागृहात जाऊन बघा.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar