मुळशी पॅटर्न चित्रपटाची रिलीज डेट जाहीर.. या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित...

PRAVIN TARDE

प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी चित्रपट मुळशी पॅटर्न’  काही दिवसापूर्वी चांगलाच चर्चेत आला होता.

चित्रपटातील ‘आरारारा’ या गाण्यामध्ये खरे गुन्हेगार झळकल्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडाल होता.  चित्रपटामध्ये गुन्हेगार झळकले असतानाही 
दिग्दर्शकांनी याचं समर्थनही केलं हे अनेक जणांना खटकलं.

 

 प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचं मोशन पोस्टर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रदर्शित केलं आहे.बहुचर्चित ठरलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाद्वारे शेतकऱ्यांच्या 
जीवनावर भाष्य केलं जाणार आहे.  हा चित्रपटमुळशी गावावर आधारित आहे, त्यामुळे यातून मुळशी गावामधील शेतकरी बांधव, पोलीस अधिकारी आणि गावाचा इतिहास 
यांच्या भोवती चित्रपटाचं कथानक फिरत असल्याचं दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलं. या चित्रपटाची निर्मिती अभिजीत भोसले आणि पुनीत बालन यांनी केलं आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar