या हँडसम हंक ची होणार बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री

Who will be the Next Wild Card Entry of Bigg Boss Marathi 2?

 
बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये मागच्या आठवड्यात शिवानीची एंट्री झाली आणि शिवानी घरात कश्याप्रकारे खेळणार? हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. मात्र शिवानी ह्या घरात काही दिवसांची पाहुणी असल्यानं ती कधीही घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. ह्या शनिवारच्या वीकेंडच्या डाव मध्ये एका नव्या स्पर्धकाची वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची झलक बिग बॉसच्या कालच्या एपिसोड मध्ये बघायला मिळाली.
 
Shivani Surve
 
सूत्रांच्या माहितीनुसार हा स्पर्धक आरोह वेलणकर असण्याची शक्यता आहे. आरोहने अनेक एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची चुणूक दाखवून दिल्यानंतर २०१४ साली रेगे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर घंटा आणि हॉस्टेल डेज या चित्रपटांमध्ये तो मध्यवर्ती भूमिकेत झळकला. मध्यंतरी 'व्हाय सो गंभीर?' या त्याच्या पहिल्यावहिल्या व्यावसायिक नाटकाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग यशस्वीरित्या रंगभूमीवर पार पडले आहेत.
 
Aaroh Welankar
 
सध्या बिग बॉसच्या घरात महिलांची मध्यवर्ती सत्ता बघायला मिळत आहे. सध्या घरातल्या १० स्पर्धकांपैकी ३ स्पर्धक पुरुष आहेत. आरोहच्या येण्यामुळे बिग बॉसच्या घरातील बॉईज गॅंगला एक नवीन मेंबर मिळेल.
आधीचे एपिसोड बघून त्यानुसार स्ट्रॅटेजी आखण्याचा फायदा बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करणाऱ्या स्पर्धकांना असतो. आता आरोह वेलणकर बिग बॉसच्या घरात काय नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येईल? आरोहच्या येण्यानं घरातील भांडणांना आळा बसेल का? आरोह कोणत्या ग्रुप मध्ये सामील होईल?  शिवाय 'घंटा' या चित्रपटामध्ये आरोह आणि शिवानी सुर्वे एकत्र झळकले होते. त्यामुळे त्यांच्यात काही वेगळी केमिस्ट्री बघायला मिळेल का? हे सगळंच पाहणं औत्सुक्यपूर्ण आणि तितकंच मनोरंजक ठरणार आहे.
 
Aaroh Welankar
 

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar