श्रेयस तळपदे करणार बिग बजेट स्पोर्ट्स ड्रामा... वाचा संपूर्ण माहिती येथे

SHREYAS TALPADE

 मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेमासृष्टीत देखील चांगले नाव कमावले आहे. ओम शांती ओम गोलमाल यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीच्या भूमिका केल्या आहेत. सध्या अभिनेता श्रेयस तळपदे एका स्पोर्ट्स रामा चित्रपटावर काम करत आहे. 'पोस्टर बॉईज' सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केल्यानंतर पुन्हा एकदा श्रेयस तळपदे दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात श्रेयस तळपदे यांनी ही माहिती शेअर केली.
 यावर अधिक बोलताना श्रेयस तळपदे म्हणाले की, "मी सध्या एका चित्रपटाच्या स्क्रिप्टचे लेखन करत आहे. हॉर्स रायटिंग वर आधारित बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमातील मुख्य पात्र ५५ वर्षाचे आहे. परंतु मी या सिनेमात काम करणार नाहीये. चित्रपटाचे बजेट पाहता आम्हाला तेवढ्याच ताकदीचा हिरो हवा आहे." अभिनय, निर्माता आणि दिग्दर्शन या तीनही क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रेयस तळपदे कडून यावेळेस काय नवीन पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच असेल. 

Read Next...


Featured News

Read something similar