'चोरीचा मामला' चे चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच

CHORICHA MAMLA

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित "चोरीचा मामला" या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. या चित्रपटात जितेंद्र जोशी, अमृता खाननिलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर अशी तगडी स्टारकास्ट असून,  लियो नावाच्या एका कुत्र्याची भूमिका देखील आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
 
 
 
हेही वाचा : स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र २’ मध्ये होणार या अभिनेत्रीची एण्ट्री.
 
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.  प्रियदर्शन जाधवनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 
 
 
 
हेही वाचा : अतुल परचुरे घेऊन येणार 'अळीमिळी गुपचिळी' ....
 
चित्रपटाच्या पोस्टरमधूनच चित्रपट धमाल आणि मनोरंजक असल्याचं आपल्याला कळतं. चित्रपटातील व्यक्तिरेखा अर्कचित्राद्वारे मांडण्यात आल्या आहेत. एक चोरी, त्यात होणारा गोंधळ आणि वाढत जाणारा गुंता असं चित्रपटाचं कथासूत्र आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे.
 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar