स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेचे १०० भाग पूर्ण.

STAR PRAVAH

स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेचे १०० भाग नुकतेच पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीमनिर्माते दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड सेटवर उपस्थित होते. संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याची भावना दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : सोनी मराठीची नवी मालिका येतेय लवकरच...

 

श्री गुरुदेव दत्त या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. १०० भागांच्या या भक्तीमय सोहळ्यात दत्तगुरुंचा जन्मापासूनचा प्रवास पाहायला मिळाला. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच महत्त्वाचा आणि उत्कंठावर्धक असेल. दत्तांनी संगमभूमी म्हणजेच गाणगापूर शापमुक्त करण्यासाठी अखंड प्रयत्न केले. मात्र कर्णकुमाराच्या खोट्या जाळ्यात अडकलेली आणि भक्तीचा विसर पडलेली संगमभूमीची जनता श्री दत्तांनाच दोषी ठरवत त्यांना संगमभूमी सोडून जायला भाग पाडते आहे. कर्णकुमार श्री दत्तांच्या विरोधात त्यांच्या आई-वडिलांनाही उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे. संगमभूमीतील जनतेला श्री दत्तांची महती कशी पटणार याची गोष्ट श्री गुरुदेव दत्त मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

 

हेही वाचा : लता दीदींच्या गीतांनी बहरलं 'ह.म.बने तु.म.बने' मालिकेतील कुटुंब

श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तगुरुंची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने १०० भागांचा टप्पा गाठल्याचा आनंद व्यक्त केला. हा दिवस खूप आनंदाचा आहे. मेहनतीचं फळ मिळत आहे. या मालिकेवर आणि माझ्यावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मालिकेबद्दलच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवतात. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हा भारावून टाकणारा अनुभव आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच कायम रहावं हीच इच्छा व्यक्त करेन अशी भावना मंदारने व्यक्त केली.’ तेव्हा न चुकता पाहा श्री गुरुदेव दत्त सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar