शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचे हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण... वाचा संपूर्ण बातमी..

APURVA NEMLEKAR





 मराठी मालिकेमधून मराठी सिनेसृष्टीत दाखल झालेल्या अनेक कलाकारांनी नंतर मोठे नाव कमावले आहे. अनेक मालिकेच्या कलाकारांनी नंतर मोठ्या मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या "रात्रीस खेळ चाले २" मालिकेची सध्या खूप हवा आहे. या मालिकेतील 'अपूर्वा नेमळेकर' म्हणजेच "शेवंता" च्या भूमिकेची सध्या सर्वत्रच चर्चा आहे.  सोशल मीडियावरील तिच्या फोटोज, मीम्स, जोक्स आणि ट्रोलस् यांना तूफान प्रतिसाद मिळत आहे. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली 'अपूर्वा नेमळेकर' हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.








 'अपूर्वा नेमळेकर' च्या सर्व फॅन्ससाठी एक खुशखबर म्हणजे लवकरच 'अपूर्वा नेमळेकर' हिंदी सिनेमात झळकणार आहे. "सब कुशल मंगल" असे नाव असलेल्या या सिनेमातून अपूर्वा नेमळेकर पदार्पण करत आहे. लवकरच हा हिंदी सिनेमा आपल्या भेटीला येणार असल्याची बातमी 'अपूर्वा नेमळेकर' हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. तसेच कमेंटमध्ये फॅन्सने विचारणा केल्यावर तिने हा हिंदी सिनेमा असल्याची पुष्टी केली आहे. या सिनेमात तिच्यासोबत कोण कोण जगणार आणि हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याबद्दलची माहिती लवकरच जाहीर केले जाईल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar