स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच एकत्र

Spruha and Abhijeet first time sharing screen space for Marathi Movie 'Baba'

प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या बाबा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच नाटकसिनेमा आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आणि 'माझ्या नवऱ्याची बायकोया मालिकेतील गुरु म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर संजय दत्त प्रॉडक्शन्स’ आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बाबा’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. स्पृहा जोशी ही ‘पल्लवी’ आणि अभिजीत खांडकेकर हा ‘राजन’ नावाची व्यक्तिरेखा साकारत असून या चित्रपटात दोघेजण नवराबायको बनले आहेत. या चित्रपटातील अभिजीत आणि स्पृहा या दोघांनी एकत्र केलेले काम आणि त्यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे. भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेश देतो बाबा’ चित्रपट देतो. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की मी आणि अभिजीत मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. आम्ही दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत आहोत. अभिजीत आणि मी चांगले मित्र आहोतपण आम्ही याआधी कधीच एकत्र काम केले नव्हते. बाबाच्या माध्यमातून ती संधी चालून आलीयाचा मला आनंद आहे. बाबा’ ही नात्यांमधील बंधाची एक सुरेख कथा आहे. आम्हा दोघांमधील केमिस्ट्रीचा प्रश्नच उद्भवला नाहीकारण आम्ही एकमेकांना खूपच चांगले ओळखतो’.

 

अभिजीत खांडकेकर म्हणाला की या चित्रपटात माझा लुक अगदीच वेगळा आहे. बेल बॉटम पँट तसेच चौकोनी आकाराची चष्म्याची फ्रेम या सर्व गोष्टी या व्यक्तिरेखेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूपच मजा आली. स्पृहा जोशी माझी चांगली मैत्रीण आहे तसेच मी तिला खूप वर्षापासून ओळखतो. पण तिच्याबरोबर मी कधीच काम केले नव्हतेमला या चित्रपटाच्या माध्यमातून ही संधी मिळाली याचा मला आनंद आहे’.

 

 

एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे. पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात. त्यातून पुढे काय होते, बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो कि त्याला हार मानावी लागतेहे अनुभवण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट रसिकांना पाहावी लागणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. 

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar