सनम HOTLINE :- सई लोकुरचा इशारा... वाचा संपूर्ण माहिती...

SAI LOKUR

 'सई लोकुर' हे नाव बिग बॉस मराठी सीजन १ नंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित झाले. त्यापूर्वी या सुंदर अभिनेत्रीने कपिल शर्माच्या "किस किसको प्यार करू" या सिनेमात कपिल शर्माच्या बायकोची भूमिका केली होती. तसेच 'पारंबी', 'नो एंट्री' यासारख्या मराठी सिनेमात देखील ती झळकली होती. परंतु गेल्या वर्षी बिग बॉस मराठी सीजन 1 मध्ये सहभागी झाल्यानंतर तिची लोकप्रियता खूपच वाढली. आजही तिचे फॅन्स सोशल मीडियावर तिला बिग बॉस सीझन २ मध्ये परत येण्यासाठी विनवण्या करतात आणि पुन्हा एकदा सईला छोट्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार असे विचारतात. आता तिच्या पायांचा जास्त वाट पहावी लागणार नाहीये कारण सई लोकुरने तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

 बिग बॉस सीजन १ नंतर सई लोकुर आता आपल्याला एका नवीन प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे ज्याचे नाव आहे "सनम HOTLINE". तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये सईने या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यानंतर लगेचच पुढच्या स्टोरीमध्ये तिने "सनम HOTLINE" एक वेबसिरीज असल्याचे देखील सांगितले आहे. या नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगला तिने सुरुवात केली असून यामध्ये नायकाच्या भूमिकेत कोण झळकणार हे सध्यातरी सरप्राईज ठेवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार "सनम HOTLINE" मध्ये सई सोबत 'पुष्कर जोग' झळकणार असल्याच्या अफवा आहेत. परंतु आता तरी याबद्दल अधिकृत माहिती मिळाली असल्यामुळे यावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. "सनम HOTLINE" याच वर्षी ऑगस्ट नंतर प्रदर्शित होणार असल्याचे कळते.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar