स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत अमृता पवार साकारणार जिजामाता...

AMRUTA PAWAR TO PLAY JIJAMATA ON SMALL SCREEN

 

 

स्वराज्याचा रक्षणकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवबांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा  होताजिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं तिथे-तिथे या रयतेच्या राजाचाउल्लेख हा होतोचआपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळे शिवबाच्या पखांमध्ये आलं ती जिजाऊशिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा लढवय्या घडवणाऱ्या त्या माऊलीचा या प्रवासातमोलाचा वाटा होतायाच माऊलीच्या कर्तृत्त्वाला सलाम करत सोनी मराठी स्वराज्य जननी जिजामाता च्या निमित्ताने या वीरमातेची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.

 

 

 

 

 वेगवेगळ्या विषयांवर मालिका सादर करणारी सोनी मराठी ही वाहिनी येत्या १९ ऑगस्ट पासून  या राजमातेचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणणार आहेया मालिकेची छोटीशी झलक टीझर स्वरूपात नुकतीच सोनी मराठीवर झळकलीऐतिहासिक मालिकांची उत्सुकता महाराष्ट्रात नेहमीच पाहायला मिळाली आहेयाच पठडीतली जिजाऊंचं कर्तृत्त्व सांगणारी मालिका आता सोनी मराठीवर येणार आहे.डॉअमोल कोल्हे यांचं जगदंब क्रिएशन्स यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.तेव्हा अमोल कोल्हे आणि ऐतिहासिक मालिकानाटकं हे समीकरण पुन्हा एकदा स्वराज्य जननी जिजामाता च्यानिमित्ताने प्रेक्षक पाहू शकणार आहेतया मालिकेतून स्वराज्याच्या या जननीचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहेसोनी मराठीवर सादर होणाऱ्या या स्वराज्य जननीच्या रूपात अमृता पवार ही अभिनेत्री दिसणार आहेतेव्हा स्वराज्य जननीजिजामाताच्या भूमिकेतून अमृता पवार हिच्या अभिनयाचा नवा पैलू पाहणंऔत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

 

 

 

 "स्वराज्यजननी जिजामाताही जगदंब creations ची दुसरी निर्मितीस्वराज्यरक्षक संभाजी नंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे !

शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपलीजोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठी च्या माध्यमातून शक्यहोत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीहीमालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!- डॉक्टर अमोलकोल्हे

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar