महिला दिन स्पेशल :- मराठी सिनेमासृष्टीतील ५ महत्त्वाच्या महिला दिग्दर्शिका

5 FEMALE DIRECTORS MARATHI CINEMA

मराठी सिनेमासृष्टीमध्ये महिलांचा देखील दबदबा राहिला आहे. फक्त अभिनयापुरते मर्यादित न राहता अनेक महिलांनी दिग्दर्शन क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक नजर टाकुया मराठी सिनेमासृष्टीतील पाच महत्त्वाच्या महिला दिग्दर्शकांच्या आजवरच्या प्रवासावर...


 * श्राबणी देवधर -
एक दिग्दर्शिका म्हणून आपल्या पदार्पणातील "लपंडाव" चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने 'श्राबणी देवधर' हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले. यानंतर त्यांनी "सरकारनामा" हा आणखीन एक जबरदस्त सिनेमा दिला. तसेच त्यांनी हिंदीतील अनेक चित्रपटांचे लेखन देखील केले आहे. 'लेखरू' आणि 'साटं लोटं पण सगळं खोटं' यानंतर आता त्यांचा आगामी सिनेमा 'मोगरा' लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. *  स्वप्ना वाघमारे जोशी -
अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन करून झाल्यानंतर त्यांनी मराठी सिनेमासृष्टीत मितवा या सुपरहिट सिनेमात वारे पदार्पण केले. त्यानंतर फुगे लाल इश्क आणि सविता दामोदर परांजपे माधुरी यासारखे सिनेमे देऊन अजूनही त्या मराठी श्रेष्ठ सिनेमासृष्टीत कार्यरत आहेत आणि आताच्या गाडीच्या टॉपच्या दिग्दर्शिका म्हणून त्यांची ओळख आहे.

 * कांचन अधिकारी 
दूरदर्शनवरील "दामिनी" या सुपरहिट मालिकेचे दिग्दर्शन करून 'कांचन अधिकारी' यांनी मराठी मालिका विश्वात पदार्पण केले. त्यानंतर "मानिनी", "बापरे बाप डोक्याला ताप", "हुतुतू", "दोघात तिसरा आता सगळं विसरा", आणि "मोकळा श्वास" या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत देखील आपला ठसा उमटवला आहे. * समृद्धी पोरे -
वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोर्टाततीलच एका केस वर "मला आई व्हायचंय" हा सिनेमा बनवून त्यांनी मराठी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले. आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.  यानंतर त्यांनी "डॉक्टर प्रकाश बाबा आमटे" हा आणखीन एक दर्जेदार सिनेमा दिला आणि त्या सिनेमाला देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले. लवकरच मराठीतील पहिला हॉलिवूड चित्रपट "सुख म्हणजे नक्की काय असतं" हा सिनेमा 'समृद्धी पोरे' आपल्यासाठी घेऊन येणार आहेत.


 * सुमित्रा भावे 
अनेक दर्जेदार आणि आशयघन लघुपट आणि चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये 'सुमित्रा भावे' हे नाव वरच्या क्रमांकावर असेल. लघुपट आणि चित्रपट मिळून तब्बल ७ राष्ट्रीय पुरस्कारांवर त्यांनी आपली मोहर उमटवली आहे यावरूनच त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा दर्जा कळून येतो.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar