अक्षय कुमारच्या उपस्थितीत पार पडला चुंबकचा ट्रेलर लाँच सोहळा!

AkShay Kumar with 'Chumbak' Cast.


बॉलीवूडचा सुपरस्टार, अक्षय कुमारच्या उपस्थितीत चुंबक ह्या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित करण्यात आला.

 प्रख्यात गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे आणि चित्रपटातील इतर कलाकार सोहळ्यात उपस्थित होते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्दर्शक संदीप मोदी  आणि लेखक सौरभ भावे यांच्या सह चित्रपटाचे निर्माते नरेन कुमार तसेच केप ऑफ गुड फिल्म्सचे सदस्यही कार्यक्रमाला उपस्थित होते.


हा चित्रपट स्वानंद किरकिरे यांनी स्वीकारण्या मागचे कारण म्हणजे चित्रपटात असलेली त्यांची व्यक्तिरेखा. “ही व्यक्तिरेखा साकारणे हे एक मोठे आव्हान तर होतेच पण आयुष्यातील ती एक महत्वाची भेटही होती” असं स्वानंद यांच म्हणणं आहे.

चुंबक हा साध्या सरळ माणसांच्या आयुष्यातील घटनांवर आणि त्यांच्या आयुष्यातील द्विधा मनस्थितींवर आधारित एक वेगळा चित्रपट आहे.

चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया, नरेन कुमार आणि केप ऑफ गुड फिल्म्सनी केली असून दिग्दर्शन संदीप मोदी यांनी केले आहे.   चुंबक २९ जुलै रोजी
सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


Read Next...


Featured News

Read something similar