सायकोलॉजिकल थ्रिलर रिंगा रिंगा सिनेमाला ९ वर्षे पूर्ण...

RINGA RINGA POSTER
 मराठी सिनेमांमध्ये थ्रिलर चित्रपट बनवणे खूप कमी प्रमाणात पहायला मिळते. म्हणूनच मराठी इंडस्ट्रीला चांगल्या दर्जाचे परंतु काही मोजकेच थ्रिलर सिनेमे मिळाले आहेत. त्यातही मनोवैज्ञानिक रहस्यमय चित्रपट (सायकोलॉजिकल थ्रिलर) म्हणजे शंभरात एखादा चित्रपट. या चौकटीत मोडणारा 'संजय जाधव' दिग्दर्शित "रिंगा रिंगा" हा सिनेमा आजच्याच दिवशी २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. 'अजिंक्य देव', 'भरत जाधव', 'संतोष जुवेकर', 'अंकुश चौधरी', आणि 'सोनाली कुलकर्णी' अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळाली होती. राजकारणातील लोक सामान्य माणसाचा कसा फायदा घेतात आणि एक सामान्य स्त्री रहस्यमयरित्या कशा प्रकारे बदला घेते याची क्षणाक्षणाला थरार वाढवणारी कथा 'संजय जाधव' यांनी योग्यरीत्या मांडली होती. आपल्या जवळ नसणारी माणसे मनोवैज्ञानिकरित्या आपल्याला जवळ असल्यासारखेच अनुभवायला मिळतात असा भावनिक गुंतागुंतीचा क्षण देखील या सिनेमात छानरित्या मांडला गेला आहे.


 रहस्यमय सिनेमात सहसा गाण्यांसाठी जागा नसते. परंतु तसे या सिनेमाच्या बाबतीत घडत नाही, सिनेमाच्या सुरुवातीलाच 'उमेश जाधव' यांनी कोरिओग्राफ केलेले आणि 'अजय-अतुल' यांनी संगीतबद्ध केलेले "बायगो... बायगो..." हे गाणे सर्वांनाच नाचायला भाग पाडते. तसेच परिस्थितीवर आधारीत "घे सावरून साजना" हे गाणे देखील तितकेच चांगले.. एक तगडी स्टार कास्ट, चांगली कथा, सुरेख संगीत आणि थ्रिलिंग अनुभव देणारे दिग्दर्शन या गोष्टींसाठी हा सिनेमा नक्कीच लक्षात राहतो.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar