अनुभवायला मिळणार जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट.

Sony Marathi

हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. 

स्वराज्याच्या महिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा-शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो  काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा.  सनई – चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा. या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण  वाचलं  ही असेल पण  सोनी मराठीवर सुरू असलेल्या “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे. लाडक्या लेकीचं तळहात किती मऊ ,कुन्या राजाला कन्या देऊ. 

हेही वाचा : या मराठी अभिनेत्रीचे आहेत इंस्‍टाग्रामवर मिलियनपर्यंत फॉलोअर्स.... वाचा संपूर्ण बातमी.

त्याकाळी लखुजी जाधव यांची अवस्था काहीशी या ओवीसारखी झाली असेल . आपलं काळीज सासरी पाठवताना वडील लखुजी यांची घालमेल होते आहे. जिजा-शहाजींच्या मिलनाने भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यांची सोयरीक जुळणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या जिजाऊ - शहाजीराजेंच्या मिलनाचा हा क्षण अगदी नजरेत साठवावा असाच असणार तर पाहायला विसरू नका असे अनेक क्षण  जे तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जातील यात शंका नाही .

 हेही वाचा : 'सई ताम्हणकर' नव्या भूमिकेत.... 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे.

हेही वाचा : स्टार प्रवाहच्या कलाकारांनी शेअर केल्या दिवाळीच्या आठवणी.

 ऐतिहासिक वातावरणात जिजा-शहाजींची बांधली जाणारी गाठ प्रेक्षकांसाठी  पाहणे खरेच  विशेष ठरणार आहे. ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी ८.३० वाजता हळदीपासून लग्नापर्यंतचे सगळे विधी प्रक्षेपित केले जाणार आहेत. सोनी मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची  अनेक वैशिष्ट्य आहेत . भोर च्या ऐतिहासिक वाड्यातील  चित्रीकरण , इतिहासाचा साज चढलेले दागदागिने, पेहराव, रोषणाई, सजावट या सगळ्यांची ऐतिहासिक बांधणी या विवाह सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे.  पीएनजी आणि सन्स यांनी खास ह्या सोहळ्यासाठी त्याकाळातील असे खास  दागिने तयार केले आहेत. ह्या खास सोहळ्याला अजून विशेष करण्यासाठीच की  काय म्हणून छान से गाणे ही रचले आहे.  महाराष्ट्र घडवणाऱ्या या सप्तपदीचे , जिजा आणि  शहाजी ह्यांच्या विवाह सोहळ्याचे ह्याची देही ह्याची डोळा  साक्षीदार तुम्हीही व्हा आणि नक्की पहा  अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह  ४  नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar