जीव झाला येडापिसा मालिकेतील शिवा आणि सिद्धी पांडुरंगाच्या वारीत... पहा फोटोज येथे

SHIVA AND SIDDHI FROM JEEV ZALA YEDAPISA TO JOIN VAARI

 

 

 संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती आणि चैतन्याचे वातावरण आहे. अनेक भक्तजण पांडुरंगाच्या वारीत आनंदाने सहभागी होतात आणि पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जातात. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी एकादशीच्या वारीची सध्या सर्वच न्यूज चैनल, सोशल मीडिया आणि टीव्हीवरील मालिकांमध्ये चर्चा आहे. नुकतीच सुरू झालेली कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका "जीव झाला वेडा पिसा" प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील शिवा आणि सिद्धी या दोन व्यक्तिरेखा अशोक फळ देसाई आणि विदुला चौगुले उत्तम पद्धतीने साकारत आहेत. सध्या या मालिकेत या दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे ताणतणाव असलेले दाखवत आहेत. परंतु लवकरच शिवा आणि सिद्धी आपापसात भांडण विसरून पांडुरंगाच्या वारीत सहभागी होणार आहेत. जीव झाला वेडा पिसा मालिकेच्या याच आठवड्यातील भागात शिवा आणि सिद्धी पांडुरंगाच्या वारीत सहभागी होतानाचा एपिसोड पहायला मिळणार आहे. तत्पूर्वी या एपिसोडचे काही एक्सक्लुसिव्ह फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पहा हे फोटोज येथे..

 

 

 

 

 

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar