अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान होणार नवरा-बायको!

ANIKET VISHWASRAO & TEJASHREE PRADHAN

मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव याचा नुकताच प्रदर्शित झालेला हृदयात समथिंग समथिंग  हा
चित्रपट सर्वत्र गाजत आहे .

 या चित्रपटात अनिकेत बरोबर त्याची रिअल लाईफ जोडीदार अभिनेत्री स्नेहा चव्हाण सुद्धा  मुख्य भूमिकेतआहे.

चित्रपट लव्ह स्टोरी असून या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता अनिकेत सज्ज झाला आहे एका विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला यायला ज्यात त्याच्या सोबत होणार सून मी ह्या घरची
 फेम, अभिनेत्री तेजश्री प्रधान असणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हंगामा प्लेच्या पॅडेड की पुशअप’या कार्यक्रमाद्वारे दोघंही पहिल्यांदाच नवराबायकोची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्या सोबत अभिनेत्री किशोरी अंबिये आणि पक पक पकाक फेम अभिनेतासक्षम कुलकर्णी यांच्या विनोदाचा तडका 
पॅडेड की पुशअपमध्ये बघायला ळणार आहे.

किशोरी अंबिये या अनिकेतच्या सासूच्या भूमिकेत दिसणार असून हा कार्यक्रम धम्माल विनोदी ठरेल यातकाही शंका नाही. बायको आणि सासू पासून एक गुपीत लपवण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवऱ्याच्याभूमिकेत अनिकेत दिसणार आहे.

हे रहस्य लपवताना अनेक विनोदी प्रसंग त्याच्या आयुष्यात घडत जातात. तेव्हा अशा मित्राला त्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोस्ताच्या 
भूमिकेत सक्षम कुलकर्णी असणार आहे.

लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेजश्री प्रधान  अनिकेत विश्वासराव यांना एकत्र बघायला प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येईल अशी आम्हाला खात्री आहे.

 

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar