अतुल परचुरे घेऊन येणार 'अळीमिळी गुपचिळी' ....

ATUL PARCHURE

झी मराठी आतापर्यंत आपल्यासाठी बरेच वेगवेगळ्या थाटणीचे कार्यक्रम घेऊन आले आहे.  असे अनेक शो आपण पहिले आहे ज्यात कलाकार आपले अनुभव, कुटुंबातील काही किस्से सांगतात. पण आता  झी मराठी वाहिनीवर एक चॅट शो येणार आहे ज्यात कलाकार मुलांसोबत सज्ज होणार आहे. या कार्यक्रमाचे नाव 'अळीमिळी गुपचिळी' असे नाव असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अतुल परचुरे सांभाळणार आहे.  तसेच स्नेहलता वसईकर आणि चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाचा उपविजेता अर्णव काळकुंद्री देखील या कार्यक्रमाचा हिस्सा असतील.

 

हेही वाचा : अभिनेत्री पूजा सावंत चा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

 

आई- वडील  लहान मुलांना खोट बोलू नको असं सतत सांगत असतात, पण कधीतरी मुलांच्या खरेपणामुळे देखील  आई बाबा अडचणीत येतात. कलाकारांच्या बाबतीतही असे अनेक किस्से घडतात आणि हेच किस्से कलाकार 'अळीमिळी-गुपचिळी' मंचावर सगळ्यांसोबत शेअर करतील.  लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो 'अळीमिळी गुपचिळी'  १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चॅट शोमध्ये कलाकार आणि त्यांच्या मुलांमधील मिश्कील संवाद प्रेक्षकांना अनुभवता येईल.

 

 

 

हेही वाचा : स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र २’ मध्ये होणार या अभिनेत्रीची एण्ट्री.

 

या मालिकेतून नवनवीन गोष्टी समोर येणार आहेत. या मालिकेचे आतापर्यंत कुशल बद्रिके आणि त्याचा मुलगा तर दुसऱ्या प्रोमोमध्ये अद्वैत दादरकर आणि त्याची मुलगी असे या दोन प्रोमोत आहेत. कलाकारांच्या पाठोपाठ आता त्यांची लहान मुलं देखील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar