ठाकरे समोर हिंदीतल्या चीट इंडिया सिनेमाची माघार... सिनेमाची तारीख बदलली...

THACKERAY POSTER
हिंदूह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित "ठाकरे" या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. आणि याला कारणेही तशीच आहेत, बाळासाहेबांची लोकप्रियता आणि सिनेमाचा पावरफूल ट्रेलर आणि त्यातील संवाद. बहुप्रतीक्षित असा हा सिनेमा २५ जानेवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतात प्रदर्शित होणार आहे आणि या समोर इमरान हाश्मीचा "चीट इंडिया" हा सिनेमा रिलीज होणार होतात परंतु आता त्या सिनेमाने "ठाकरे" समोर माघार घेतली आहे.

 नुकताच मुंबईत एका पत्रकार परिषदेत "चीट इंडिया" च्या निर्मात्यांनी सिनेमाची तारीख बदलली असल्याची घोषणा केली आहे. आता हा सिनेमा "ठाकरे" सिनेमाच्या एक आठवडा आधी म्हणजेच १८ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होईल. याप्रसंगी "ठाकरे" चित्रपटाचे निर्माते शिवसेना नेते खासदार 'संजय राऊत', युवासेना प्रमुख 'आदित्य ठाकरे' यांच्यासह अभिनेता 'इमरान हाश्मी', 'तनुज गर्ग', 'अतुल कसबेकर' उपस्थित होते.


 


 बाळासाहेबांबद्दल असलेल्या आदरामुळे आणि व्यावसायिक दृष्ट्या विचार करून आम्ही सिनेमाची तारीख बदलली आहे असे "चीट इंडिया" चे निर्माते म्हणाले. तर युवा सेनाप्रमुख 'आदित्य ठाकरे' म्हणाले की, "चीट इंडिया आणि ठाकरे हे दोन्ही सिनेमे माझ्या जवळचे आहेत. प्रेक्षक आधी चीट इंडिया पाहून शिक्षण व्यवस्थेविषयी आपला राग व्यक्त करतील, तर पुढच्या आठवड्यात ठाकरे सिनेमा पाहून अन्यायाविरुद्ध लढण्याची बाळासाहेबांकडून प्रेरणा घेतील."

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar