रेकॉर्ड ब्रेकिंग लय भारी सिनेमाला ५ वर्षे पूर्ण... वाचा सिनेमाचे बॉक्स ऑफीस रेकॉर्डस्

RECORD BREAKING BLOCKBUSTER LAI BHARI TURNS 5 TODAY

 

 

 

 

 अभिनेता आणि सुपरस्टार रितेश देशमुख याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावल्यानंतर स्वतःहून मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा दर्शवली होती. यासाठी प्रेक्षकांना त्याच्या बॉलिवूड पदार्पणापासून १० वर्षे वाट पहावी लागली आणि २०१४ मध्ये "लय भारी" या सिनेमातून त्याने मराठी सिनेमासृष्टीत एकदम भारी पदार्पण केले. निशिकांत कामत दिग्दर्शित "लय भारी" या सिनेमाला आज ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ब्लॉकबस्टर सिनेमामध्ये रितेश देशमुख सोबत शरद केळकर, राधिका आपटे, तनवी आझमी, उदय टिकेकर, संजय खापरे, आदिती पोहनकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर जेनेलिया देशमुख आणि सलमान खान यांनी पाहुण्या कलाकारांची व्यक्तिरेखा पार पडली होती.
 
 
 
गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आणि अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुपरहिट झाली होती. या सिनेमातील पाच गाण्यांपैकी 'माऊली माऊली' आणि 'आला होळीचा सण लय भारी' हि दोन गाणी विशेष गाजली. सुपरहिट म्युझिक, रितेश देशमुखचे मराठीत पदार्पण आणि मराठी सिनेमासृष्टीत खुप दिवसानंतर एक ॲक्शन मसालापट या तीनही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून "लय भारी" या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्डस् मोडीत काढले. लय भारी सिनेमाच्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् ची यादी खालीलप्रमाणे.
पहिला दिवस- ३.१० कोटी 
दुसरा दिवस- ३.६० कोटी
तिसरा दिवस- ३.८५ कोटी
ओपनिंग विकेंड- १०.५५ कोटी
पहिला आठवडा- १७.१० कोटी
दुसरा आठवडा- २६.४३ कोटी
एकूण कमाई- ३७.५० कोटी
 
 
 
 
 
 
 पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत "लय भारी" ओपनिंग विकेंडला १० कोटींची कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. तसेच एकूण ३७ कोटींची कमाई करत या सिनेमाने "टाइमपास" या सिनेमाच्या ३६ कोटींच्या विक्रमाला मागे सारत त्यावेळचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा होण्याचा मान मिळवला.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar