ऋता दुर्गुळे आणि संजय जाधव एकत्र काम करणार....

HRUTA DURGULE AND SANJAY JADHAV


 'झी युवा' वाहिनी वरील "फुलपाखरू" लोकप्रिय मालिका गेले जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील वैदहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' हिने असंख्य चाहत्यांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. तर दुसरीकडे अनेक सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक 'संजय जाधव' यांच्याबद्दल काही वेगळे सांगायला नको. या दोन लोकप्रिय चेहऱ्यांना एकत्र पाहण्याची संधी मिळाली तर यापेक्षा दुसरी उत्साही गोष्ट नसावी. आणि लवकरच 'ऋता दुर्गुळे' आणि 'संजय जाधव' एकत्र काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.


 


 अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' ने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'संजय जाधव' यांचा "फुलपाखरू" मालिकेच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला होता. आणि त्यासोबत तिने लिहिले होते की 'संजय जाधव' सोबत काम करण्यास खूपच उत्सुक आहे. त्याचबरोबर "फुलपाखरू" मालिकेचे सर्वेसर्वा 'मंदार देवस्थळी' यांनी देखील 'संजय जाधव' यांच्यासोबत फोटो पोस्ट केला आणि सांगितले की काहीतरी नवीन लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. 
Video Link ==> https://www.instagram.com/p/BvBa--vhYuU/?utm_source=ig_web_copy_link
 या दोन्ही पोस्ट वरुन एक गोष्ट सिद्ध होते की लवकरच दिग्दर्शक 'संजय जाधव' आणि अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' आपल्याला एकत्र पाहायला मिळतील. परंतु ते कशासाठी आणि कशाप्रकारे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. 'झी युवा' वरील "फुलपाखरु" मालिकेतून लवकरच या गोष्टीचा देखील उलगडा होईल. आधीच लोकप्रिय असलेल्या "फुलपाखरू" मालिकेच्या लोकप्रियतेत 'संजय जाधव' यांचे नाव आणखीन भर घालणार यात शंकाच नाही.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar