मल्टीस्टारर पॉंडिचेरी सिनेमात महेश मांजरेकरांची एन्ट्री..

PONDICHERRY CAST

 "वजनदार" आणि "गुलाबजाम" सारखे सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक 'सचिन कुंडलकर' एक नवीन प्रयोग करत आहेत. त्यांचा पुढील सिनेमा "पॉंडिचेरी" एका नव्या विषयावर आधारित नवीन प्रयोग असेल. या सिनेमाचे शूटिंग स्मार्टफोनवर करण्यात आले असून पॉंडिचेरी मधील वेगवेगळ्या लोकेशन्सवर शूट झाला आहे. या सिनेमात अनेक कलाकारांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता या सिनेमात आणखीन एका नव्या चेहऱ्याची भर पडली आहे ती म्हणजे 'महेश मांजरेकर' यांची.

 'सचिन कुंडलकर' दिग्दर्शित "पॉंडीचेरी" या सिनेमात 'सई ताम्हणकर', 'वैभव तत्ववादी', 'अमृता खानविलकर', 'नीना कुलकर्णी', 'तन्मय कुलकर्णी' अशी तगडी स्टारकास्ट आहे. या तगड्या स्टारकास्टमध्ये आणखीन एक तगड्या अभिनेत्याचा समावेश झाला आहे. अभिनेते, दिग्दर्शक 'महेश मांजरेकर' या सिनेमात एक वेगळी भूमिका साकारणार आहेत. याबद्दलची अधिकृत घोषणा 'सचिन कुंडलकर' यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर केली आहे.


 "The Don Join The Gang... #SmartphoneFilm #Pondicherry " अशा शब्दांत सचिन कुंडलकर यांनी सोशल मीडियावर महेश मांजरेकरांच्या समावेशाची बातमी दिली. तसेच आज या सिनेमाचे शुटिंग अधिकृतरित्या संपन्न झाले आहे याची देखील घोषणा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर केली.  आहे. स्टारकास्ट पाहिल्यानंतर या सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आणि अन्य माहिती उपलब्ध होईल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar