या ५ मराठी दिग्दर्शकाचे हे सिनेमे २०१९ वर्षात करणार कमाल...

UPCOMING MARATHI FILMS IN 2019
सिनेमा म्हणजे दिग्दर्शकाने पाहिलेले एक स्वप्न असते. सिनेमाचा विषय आपल्या क्षमतेनुसार आणि चलाखीने सादर करण्याचे अवघड काम दिग्दर्शकाचे असते. मराठी सिनेमासृष्टीतही गुणी दिग्दर्शकांची कमी नाही आणि त्यामुळेच अनेक दिग्दर्शकांनीआपल्या प्रबळ कामाच्या जोरावर नाव कमावले आहे. २०१९ या वर्षात देखील अनेक मराठी दिग्दर्शक वेगवेगळ्या विषयावरील त्यांचे सिनेमे घेऊन येत आहेत. आपण एक नजर टाकूया त्यातील ५ दिग्दर्शकांच्या महत्त्वाच्या सिनेमांवर.
 १) संजय जाधव
'चेकमेट' सारख्या थ्रिलर पासून दिग्दर्शनाचा प्रवास सुरू केलेल्या 'संजय जाधव' यांनी "फक्त लढ म्हणा", "दुनियादारी", "ये रे ये रे पैसा" सारखे सुपर हिट सिनेमे दिले आहेत. आणि आता २०१९ वर्षात त्यांचा नवीन सिनेमा "लकी" ७ फेब्रुवारीला आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आपल्याला नवा हिरो आणि नवी हिरॉइन तसेच 'संजय जाधव' यांच्या दिग्दर्शनाचा मिडास टच म्हणजेच धमाल मनोरंजन पाहायला मिळेल.
 २) रवी जाधव
लागोपाठ पाच सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर "न्यूड" सारख्या आशयघन सिनेमाने रवी जाधव यांना मराठी सिनेसृष्टीतील एक भरवशाचा दिग्दर्शक म्हणून स्थान मिळवून दिले आहे. रवी जाधवचा पुढच्या सिनेमाचे नाव आहे "रंपाट" ज्याचे शुटिंग सध्या सुरू आहे आणि लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.

  ३) परेश मोकाशी
"हरिश्चंद्राची फॅक्टरी", "एलिजाबेथ एकादशी" आणि "चि. व चि. सौ. का." असे दर्जेदार तसेच हिट सिनेमे दिल्यानंतर 'परेश मोकाशी' त्यांचा पुढचा सिनेमा घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे "खटला बिटला". PIFF मध्ये स्क्रिनिंगसाठी निवड झाल्यामुळे आणि दर्जेदार सिनेमांसाठी ओळख असणाऱ्या परेश मोकाशी यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.


 ४) सचिन पिळगावकर
८० च्या दशकापासून दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले आणि आपल्याला अनेक हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक 'सचिन पिळगावकर' २०१९ वर्षात घेऊन येत आहेत "अशी ही आशिकी". लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पुत्र अभिनय बेर्डे यांची प्रमुख भूमिका असलेला या प्रेमाकथेत काही नवीन धमाल पाहायला मिळणार अशी अपेक्षा आहे. ५) अभिजित पानसे
"रेगे" सारखा वास्तववादी आणि गुन्हेगारी जगतावर आधारित सिनेमा केल्यानंतर 'अभिजीत पानसे' त्यांचा दुसरा सिनेमा घेऊन येत आहेत तो म्हणजे 'बाळासाहेब ठाकरे' यांचा चरित्रपट "ठाकरे". सध्या या सिनेमाची सर्वत्रच चर्चा आहे आणि २५ जानेवारी २०१९ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या पाच ही सिनेमांना घवघवीत यश मिळेल, हिच शुभेच्छा.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar