प्रतीक्षा संपणार.. अनाजीपंत आणि स्वराज्यद्रोह्यांना हत्तीच्या पायी देणार.. पहा फोटोज येथे

SWARAJYA RAKSHAK SAMBHAJI MARATHI SERIAL

 

 

 
 
 झी मराठी वाहिनीवरील "स्वराज्य रक्षक संभाजी" ही मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ही भव्यदिव्य मालिका टीआरपीच्या बाबतीत नेहमीच वरचढ राहिली आहे. अमोल कोल्हे साकारत असलेली संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. तर याउलट काहीशा निगेटिव्ह भूमिकेत म्हणजेच अनाजीपंतच्या भूमिकेत 'महेश कोकाटे' यांना देखील प्रेक्षकांनी तितकेच पसंत केले आहे. विष प्रयोग आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संभाजी महाराजांनी त्यांना वैयक्तिक पातळीवर माफी दिली परंतु आपले अवघे स्वराज्य मुघलांच्या घशात घालण्याचा डाव केला, या गुन्ह्यासाठी क्षमा नाही. स्वराज्यद्रोह्यांना हत्तीच्या पायी देण्यात यावे अशी शिक्षा महाराजांनी सुनावली आणि लवकरच त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. गेले कित्येक दिवस प्रेक्षक अनाजीपंतला शिक्षा व्हावी म्हणून वाट पाहत होते आणि आता लवकरच प्रतीक्षा संपण्याच्या वाटेवर आहे. अनाजीपंत आणि इतर स्वराज्यद्रोह्यांना हत्तीच्या पायी देणार असल्याच्या भागाचे चित्रीकरण झाले असून त्याचे काही एक्सक्लुसिव्ह फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.. पहा हे फोटोज येथे...
 
 
 
 
 
 
 

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar