भावा - बहिणीच्या निरागस नात्यावर आधारित "खारी बिस्कीट" चित्रपटाला मिळतोय प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद.

KHARI BISCUIT

एक अतूट असं नातं म्हणजे भाऊ - बहीण.  लहान मुलांच्या नातेसंबंधांवर आत्तापर्यंत मराठीत बरेच सिनेमे आपण पहिले आहे. त्यातील काही सिनेमे मनाला भावणारे आहेतच. भाऊ बहीण असं हे गोड नातं जे कधी तुटू शकत नाही अशाच भावा बहिणीच्या नात्यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे "खारी बिस्कीट". "खारी बिस्कीट"  हा चित्रपट १ नोव्हेंबरला  सर्वत्र प्रदर्शित झाला.  खरतर या सिनेमाचा  ट्रेलर पाहून यातील मुलांचा अभिनय  पाहून हा सिनेमा सगळ्यांच्या पसंतीस उतरणार अशी  सर्वांनाच खात्री होती. या चित्रपटाची खरी कथा सुरु होते ती म्हणजे सचिनच्या वर्ल्डकप पासून सचिन तेंडुलकरचा खेळाडू म्हणून  लास्ट वर्ल्डकप असतो. दुसरीकडे म्हणजे खारी (वेदश्री खाडिलकर) आणि बिस्कीट ( आदर्श  कदम) या  बहिण भावाची जोडी आणि त्यांची कहाणी. खारी जन्मापासूनच हे जग आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. पण तिची वर्ल्डकप बघण्याची खारीची खूप इच्छा असते. खारीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा भाऊ म्हणजे बिस्कीट जीवाचं रान करतो. खारी डोळ्यांनी बघू शकत नसली तरी काय झालं ती स्वप्नं तर नक्की बघूच शकते आणि तिची स्वप्नं पूर्ण करणे हे बिस्कीटच खरं आयुष्य असतं. आपली  गरीब परिस्थिती खारीला कधीच कळू द्यायची नाही यासाठी बिस्कीट आणि बिस्कीट बरोबर त्याची गॅंग सुद्धा आटोकाट प्रयत्न करत असते. खरतर हि कल्पना खूप वेगळी आणि प्रत्येकाच्या मनाला भावणारी आहे. 

   Image result for khari biscuit poster"

हेही वाचा : अभिनेता 'स्वप्नील जोशी' या चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका.

 

दिग्दर्शक "संजय जाधव" यांनी केलेलं एडिटिंग, कास्टिंग आणि चित्रपटातील सर्व गाणी छान आहेत.  फुटपाथवर राहून सुद्धा आपण बंगल्यात राहतो, विमानाने प्रवास करतो, शाहरूख,सलमान खान यांच्या डुप्लिकेटसना आणून त्यांना खरेखुरे खान भासवणे हे सार रचून आपल्या अंध बहिणीला खुश ठेवण्यासाठी झटणाऱ्या भावाचा प्रत्येक प्रयत्न बघताना नाट्यमय वाटत नाही. चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी आहेत. सिनेमातील खारी-बिस्कीट म्हणजेच वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम या दोन्ही बालकरांचा हा पहिलाच सिनेमा आहे. मात्र या दोघांनी त्यांच्या अभिनयातून या गोष्टीची झळ देखील प्रेक्षकांपर्यंत पोहचू दिली नाही. नंदिता पाटकर, संजय नार्वेकर, सुशांत शेलार, सुयश झुंझरके यांनी छोट्या भूमिकेतुन उत्तम  अभिनय केला आहे.
 
 
Image result for khari biscuit poster"
 
हेही वाचा : प्रथमेश परब होणार ‘टल्ली’. वाचा संपूर्ण बातमी.
 
हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नकळतच आपल्या बहीण भावाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.  तसेच परिस्थिती कशीही असो स्वप्नं पाहायचे थांबू नये. स्वप्नं पूर्ण करायची असतील तर जिद्द असली पाहिजे. ही  गोष्ट अगदी निरागसतेने अनुभवायची असेल तर 'खारी-बिस्कीट' नक्की बघा. 
 
 
 
 
हेही वाचा : अभिनेता 'श्रेयस तळपदे' पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन.
दिग्दर्शक – संजय जाधव

कलाकार – वेदश्री खाडिलकर, आदर्श कदम, सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते, नंदिता पाटकर, संजय नार्वेकर, सुशांत शेलार.

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar