सई लोकूर देणार ऑनलाईन ऍक्टिंगचे धडे.

सध्या सर्वच कलाकार घरबसल्या  काहींना काही करत आहेत. कोणी सोशल मीडियाचा माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारत आहेत तर कोणी स्वतःची कला जोपासताना दिसत आहे. अभिनेत्री सई लोकूर नेहमीच तिचा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. वेगवेगळ्या व्हिडीओमार्फत ती चाहत्यांना खिळून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. 

 

 

नुकताच सईने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे,  सई लोकूर  कलाकार होऊ पाहणाऱ्या इच्छुकांसाठी ऑनलाईन ऍक्टिंग क्लासेसचे धडे देणार आहे. १ जून  ते ६ जून  या दरम्यान या क्लासेसला सुरवात करण्यात येणार असून, वयोमर्यादा १६ ते २५ असणार आहे असे या व्हिडिओत तिने सांगितले आहे.  सई नेहमीच तिच्या सोशल मीडियावरून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करताना दिसत असते. सईच्या ऑनलाईन ऍक्टिंग कोर्सेची आयडिया नवीन कलाकारांसाठी पर्वणीच ठरणार आहे.   

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar