अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचाकडून पोलिसांना आमरस पुरीची मेजवानी.

मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोनाचे प्रभाव वाढतच आहे. कोरोनाच्या संकटात दिवसरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या विषाणूचा संसर्ग होताना दिसतोय.  अजूनही काही लोक या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीय, त्यामुळे पोलिसांचा टॅन देखील वाढतोय. या कोरोना योद्धासाठी  त्यांचा मदतीसाठी अनेक कलाकार धावून आले आहेत. अभिनेते अशोक सराफ व त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ पुढं आले आहेत. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पोलिसांना एक छोटसं थँक्यू म्हणून आमरस पुरीचा बेत त्यांनी आखला आहे.

 

 

मुंबईत करोनाबाधित पोलिसांची संख्या शंभरच्यावर आहे. पोलिस करोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. त्यामुळं अनेक पोलिस कुटुंबांसोबत संपर्क येऊ नये म्हणून काही दिवस पोलिस ठाण्यांत तर काही दिवस घरी राहात आहेत. या पोलिस बांधवाचे आभार मानण्यासाठी अशोक व निवेदिता सराफ यांनी त्यांना मेजवानी देण्याचा निर्णय घेतला आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आमरस पुरीचे जेवण देणार आहेत. विशेष, म्हणजे निवेदिता सराफ यांनी स्वतःच्या हातानं आमरस पुरी तयार करणार आहेत.

 

 

 

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत सरकारनं लॉकडाऊनच्या कालावधीत ३१मेपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळं पुन्हा पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे.

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar