ठाकरे मधील मीनाताईंच्या भूमिकेसाठी अमृता राव हिला दादासाहेब फाळके पुरस्कार...

DADASAHEB PHALKE AWARD

 भारतामध्ये चित्रपट सृष्टीचे सुरुवात करणारे आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे 'दादासाहेब फाळके' यांच्या नावाने दिला जाणारा "दादासाहेब फाळके पुरस्कार" भारतीय सिनेमासृष्टीत एक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून गणला जातो. यावर्षी घोषित झालेल्या पुरस्कारांपैकी मराठी सिनेमासृष्टीत सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा पुरस्कार अभिनेत्री "अमृता राव' ला घोषित झाला आहे. "ठाकरे" या 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये अभिनेत्री 'अमृता राव' हिने 'बाळासाहेब ठाकरे' च्या पत्नी 'मीनाताई ठाकरे' यांची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे.
 या पुरस्काराच्या घोषणेनंतर 'अमृता राव' हिला खूप आनंद झाला आणि तो आनंद शब्दात व्यक्त करताना ती म्हणाली की, "भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा पुरस्कार मला माॅंसाहेबांच्या भूमिकेसाठी मिळतो आहे हि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. चित्रपटातील साकारलेल्या माॅंसाहेबांच्या भूमिकेचे खूप कौतुक झालं आणि मध्ये बराच काळ होऊन गेला असला तरी प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं". "ठाकरे" चित्रपटाच्या यशानंतर नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून त्याची लवकरच घोषणा होईल असेही 'अमृता राव' हिने सांगितले.

Read Next...


Popular News

Read something similar