केतकी चितळेला शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार... वाचा संपूर्ण बातमी..

KETAKI CHITALE

 
 काही दिवसांपूर्वी 'केतकी चितळे' या अभिनेत्रीने सोशल मीडियावर मराठी आणि हिंदी भाषेवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओ पोस्टनंतर अनेक मराठी पेजेस चालवणाऱ्या ट्रोलर्सने केतकी चितळेला खूप खालच्या स्तरावर जाऊन ट्रोल केले होते. अनेकांनी तिला खूप घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केला होता. या सर्व ट्रोलर्सचा समाचार घेण्यासाठी केतकी चितळेने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये तिने त्या सर्व ट्रोलर्सची नावे आणि त्यांनी कोणत्या भाषेत तिला ट्रोल केले याबद्दल सर्व खुलासा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. अनेक मीडिया आणि सामान्य प्रेक्षकांनी याची दखल घेत त्यावर आपली मते मांडली.
VIDEO LINK -> https://www.instagram.com/tv/BypMVytFjF0/?utm_source=ig_web_copy_link

 या सर्व खळबळीनंतर अभिनेते सुशांत शेलार केतकी चितळे आणि दिगंबर नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आपली तक्रार मांडली. याविषयी सुशांत शेलार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यामध्ये लिहिले की, "नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की केतकी चितळेचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि आणि तिला ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं, हे खरंच एक मराठी माणूस आणि मराठी संस्कृती रक्षक म्हणून खूप लज्जास्पद बाब आहे आपल्या सर्वांसाठी... अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ट्रोलिंग करून समाजमाध्यमांचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं.. आपण सोशल मीडियावर काय कमेंट करतो, काय लिहतो किंवा काय फॉरवर्ड करतो याचं प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे... आपल्याला खूप चांगला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जिजाऊ, सावित्री, अहिल्याबाई यांच्या पवित्र भूमीत अशा प्रकारे जर एखाद्या स्त्री ला खालच्या आणि घाणेरड्या पातळीवर जाऊन ट्रोल केलं जातं असेल तर ही गंभीर आणि निंदनीय बाब आहे.. आणि मी याचा एक कलाकार म्हणून आणि मराठी माणूस म्हणून जाहीर निषेध करतो... अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ट्रोलिंग करून समाजमाध्यमांचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आम्ही मा. मुख्यमंत्री साहेबांना निवेदनातून केली आहे... निवेदनात अशा प्रकारे ट्रोलिंग करणारे हे समाजकंटक आहेत त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा ही व्यक्त केली आहे...

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar