सॅक्रेड गेम्स २ आणि कंगना रानौत सोबत झळकणार स्मिता तांबे... वाचा संपूर्ण बातमी

SMITA TAMBE


 जोगवा, ७२ मैल एक प्रवास, तुकाराम आणि देऊळ यासारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या छटा दाखवलेली अभिनेत्री 'स्मिता तांबे' सध्या खूप फार्मात आहे असे म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'सावट' या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठी त्याच्या खूप कौतुक देखील झाले होते. सध्या रंगभूमीवर तिचे 'इडियट्स' चे नाटक देखील खूप गाजत आहे. नंतर स्मिता तांबे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन मोठ्या हिंदी प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे. 


 सॅक्रेड गेम्स या वेबसिरीचे पहिले सीजन सुपर डुपर हिट झाले होते. या सीझनमध्ये अनेक मराठी कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर आता सॅक्रेड गेम्स सीजन २ आपल्या भेटीला येणार आहे आणि यामध्ये देखील अनेक मराठी कलाकार झळकणार असल्याची चर्चा आहे. यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे. सॅक्रेड गेम्स २ ची प्रतीक्षा गेले कित्येक दिवस प्रेक्षक करत आहेत. त्यातही स्मिता तांबे सारखी गुणी अभिनेत्री पाहायला मिळणार म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल. सॅक्रेड गेम्स व्यतिरिक्त स्मिता तांबे आणखीन दोन हिंदी प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यापैकी एक म्हणजे हिंदी 'हवा बदले हासू' ही वेबसिरीज. यामध्ये ती आरती नावाची भूमिका साकारणार आहे. तर दुसरा प्रश्न म्हणजे कंगना रानौतची भूमिका असलेला "पंगा" या सिनेमात देखील अभिनेत्री स्मिता तांबे  झळकणार आहे. लागोपाठ तीन मोठ्या प्रोजेक्टची हॅटट्रिक साधणाऱ्या स्मिता तांबेला भावी यशासाठी खूप खूप शुभेच्छा

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar