सामाजिक विषयाला विनोदी ढंगात मांडणाऱ्या येड्यांची जत्रा सिनेमाला ७ वर्षे पूर्ण. वाचा संपूर्ण माहिती

YEDYANCHI JATRA
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात अनेक प्रश्न उद्भवत असतात. शहरी भागातील लोकांपेक्षा गावाकडच्या लोकांच्या जीवनात तितकेसे ऐशोआराम पाहायला मिळत नाहीत. मूलभूत सुविधांपासून ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना सहसा मिळत नाहीत आणि अनेक मनोरंजनाच्या साधनांपासून त्यांना वंचित राहावे लागते. या सर्व गोष्टी वगळता देखील रोजच्या जीवनातील गोष्टीदेखील त्यांना तितक्या सोप्या पद्धतीने मिळत नाहीत. या सत्य घटना पासून प्रेरित एक सामाजिक प्रश्न विनोदी ढंगात मांडणाऱ्या येड्यांची जत्रा या सिनेमाला ७ वर्षे पूर्ण होत आहेत.

 'मिलिंद अरुण कवडे' यांनी लिहिलेल्या आणि त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला "येड्यांची जत्रा" हा सिनेमा ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात 'भरत जाधव', 'विनय आपटे', 'मोहन जोशी', 'महेश राऊत', 'मोनिका पंडित', 'स्नेहा कुलकर्णी', 'पॅडी कांबळे' आणि 'विशाखा सुभेदार' अशी मोठी स्टारकास्ट असल्यामुळे सिनेमात जो गोंधळ उडतो ते पाहण्याची मजा काही औरच होती. त्यावर साज चढवण्यासाठी हिंदी मालिकांमधील अभिनेत्री 'श्वेता तिवारी' चे आइटम सॉंग होतेच. ग्रामीण भागातील उघड्यावर संडास करण्याच्या परंपरेला रोखण्यासाठी आणि सरकारने राबवलेल्या योजनांवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा समाजात काहीतरी बदल घडावा या हेतूने थोड्याफार प्रमाणात यशस्वी ठरला. साधारणत: १.५ कोटीच्या बजेटवर बनलेल्या या सिनेमाने ५ कोटींच्या आसपास कमाई केल्याची त्यावेळी बातमी होती, याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बॉक्स ऑफिस पेक्षा एका गंभीर विषयाला विनोदी ढंगात लोकांपर्यंत पोहोचल्या बद्दल निर्मात्यांचे कौतुक करायलाच हवे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar