होणार सून नंतर पुन्हा एकदा सून म्हणून तेजश्री प्रधान येणार प्रेक्षकांच्या भेटीला.. पहा प्रोमो येथे

TEJASHREE PRADHAN RETURNS ON TV

 

 

 झी मराठी वाहिनीवरील 'होणार सून मी या घरची' या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक शिखरे पादाक्रांत केली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली होती यापैकी एक होती ती म्हणजे तेजश्री प्रधानने साकारलेली लाडकी सून 'जानवी'. या मालिकेने तेजश्री प्रधान हिला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवून दिली आणि त्यानंतर तिने सिनेमा आणि नाटक क्षेत्रात काम केले. कौटुंबिक मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची लाडकी सून म्हणजेच तेजश्री प्रधान पुन्हा एकदा सून म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. पहा या नवीन मालिकेचा प्रोमो येथे..

 

Video Link -> https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/2238966203084824/ 

 
 झी मराठी वाहिनीवर लवकरच "अग्गंबाई सासूबाई" नवीन कोरी मालिका सुरू होणार आहे. त्या मालिकेत तेजश्री प्रधान एका सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिच्या सासूच्या भूमिकेत अभिनेत्री 'निवेदिता सराफ' पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमो वरून एक सून आपल्या सासूच्या लग्नासाठी आग्रह दिसत आहे. काल या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक फॅन्सने तेजश्री प्रधानवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि तिला पुन्हा एकदा मालिकेमध्ये पाहण्यासाठी किती उत्सुक आहेत हे देखील सांगितले. नवीन गमतीदार विषय मांडणारी "अग्गंबाई सासुबाई" ही मालिका २२ जुलै २०१९ पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता झी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar