बिग बॉस मराठीच्या ४ थ्या आठवड्यावर बोलणार पुष्कर आणि सई... वाचा संपूर्ण बातमी..

EK GHAR BARA BHANGADI EPISODE 4
 बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन सुरू होऊन आता ४ आठवडे होत आले आहेत. या ४ आठवड्यात अनेक चांगल्या-वाईट घडामोडी आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिल्यात. बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या घडामोडींवर पुष्कर जोग यांनी मांडलेली रोख ठोक मते आपण मराठी बॉक्स ऑफिसच्या "एक घर बारा भानगडी" या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलीत. या एपिसोडला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि जवळपास १,४८,००० पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ यूट्यूब वर पाहिला आहे. यानंतर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी मराठी बॉक्स ऑफिसने सई लोकूरच्या रुपात प्रेक्षकांना मस्त सरप्राइज दिले. बिग बॉसच्या घरातील दुसऱ्या आठवड्यावर सई लोकूरने मांडलेले विचार देखील प्रेक्षकांना खूप आवडले. 'एक घर बारा भानगडी' च्या दुसऱ्या एपिसोडला आजपर्यंत १,४०,००० पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पुष्कर आणि सई या दोघांनी दोन वेगवेगळ्या एपिसोडमध्ये हा शो उत्तमरीत्या होस्ट केल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.  

 अनेक प्रेक्षकांनी सई आणि पुष्कर या दोघांना एकत्र आणून एखादा एपिसोड करावा अशी मागणी केली होती. आणि म्हणूनच एक घर बारा भानगडीच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मराठी बॉक्स ऑफिसने पुष्कर आणि सई या दोघांना एकत्रित आणण्याचा निर्णय घेतला आणि एक घर बारा भानगडीच्या ३ ऱ्या एपिसोडमध्ये या दोघांनी हा एपिसोड उत्तम रित्या होस्ट केला. एक घर बारा भानगडी च्या तिसऱ्या एपिसोडला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि आतापर्यंत २,४७,०००+ लोकांनी हा व्हिडीओ युट्यूबवर पाहिला आहे. या सुपरहिट यशानंतर मराठी बॉक्स ऑफिस 'एक घर बारा भानगडी' चा एपिसोड ४ घेऊन येत आहे उद्या, शनिवार २२ जूनला संध्याकाळी ५ वाजता फक्त मराठी बॉक्स ऑफिसचे यूट्यूब चैनल वर. तोपर्यंत पाहत रहा "एक गाव बारा भानगडी" आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत रहा.Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar