‘स्टार प्रवाह’वर सुरु होतेय नवी मालिका ‘साता जल्माच्या गाठी…’

STAR PRAVAH

प्रेम ही अडीच अक्षरं नुसती कानावर जरी पडली तरी अनेकांच्या अंतकरणातील तारा छेडल्या जातात. प्रत्येकाच्या मनात त्या खास व्यक्तीबद्दलचा हळवा कोपरा हा असतोच. प्रेमात पडणं जरी सोपं असलं तरी ते निभावणं मात्र कठीण. प्रेमासाठी कायपण करण्याची तयारी असणारे प्रेमवीर अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच. युवराज त्यापैकीच एक. श्रुतीवर जीवापाड प्रेम करणारा आणि प्रेमासाठी कायपण करायला तयार असणारा.

हेही वाचा : 'मोलकरीण बाई' मालिकेने भर पावसातही पार पाडलं शूटिंग. वाचा संपूर्ण बातमी....

 

श्रुती आणि युवराजची ही अनोखी लव्हस्टोरी स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या साता जल्माच्या गाठी या मालिकेतून पाहायला मिळेल. प्रेमाच्या आणाभाका देत सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या दोघांच्याही प्रेमाची गोष्ट वाटते तितकी सोपी नाही बरं का. यांनाही बरीच अग्निदिव्य पार करावी लागणार आहेत. म्हणूनच युवराज श्रुतीची ही प्रेमकहाणी थोडी हटके आहे. सध्या या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

'साता जल्माच्या गाठी' नावाप्रमाणेच मातीत रुळलेली लव्हस्टोरी आहे. मुख्य म्हणजे साताऱ्यात घडणारी ही  लव्हस्टोरी आहे. त्यामुळे साताऱ्यातच मालिका शूट होतेय. मालिकेतले बरेचसे कलाकार साताऱ्यातले आहेत त्यामुळे एक वेगळा सातारची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सातारच्या लोकांबरोबर इतर प्रेक्षकांचं देखील हि मालिका लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. 

 

 

हेही वाचा: रमाबाईंचं व्यक्तिमत्त्व साकारताना त्यांचे विचार आणि जिद्द मनात खोलवर रुजतेय- शिवानी रांगोळे.

 

श्वेता शिंदेच्या वज्र प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. मालिकेसाठी कलाकार आणि सातारच्या ठिकाणाची जुळवाजुळव सुरु असताना सातारा आणि आसपासच्या परिसरातील कलाकारांच्या निवडीवर भर देण्यात आला.  स्टार प्रवाहसोबत श्वेताचे जुने बंध आहेत. 'लक्ष्य' मालिकेतल्या भूमिकेसाठी श्वेताचं विशेष कौतुक झालं होतं. 'साता जल्माच्या  गाठी' च्या निमित्ताने ती निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  या मालिकेच्या निमित्ताने विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर ही जोडी टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. सातारी भाषेचा लहेजा जपत या दोघांनीही मालिकेची गोडी वाढवलीय. तेव्हा युवराज आणि श्रुतीची ही अनोखी प्रेमकहाणी रसिकांचे मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

 

 

 

 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar