पहिल्यांदाच एकत्र झळकणार सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे...

MEDIUM SPICY

  विषयाची गरज आणि कथा चांगली असेल तर मराठी कलाकार एखाद्या मल्टिस्टारर सिनेमासाठी आवर्जुन एकत्र येतात. नजीकच्या काळात 'दुनियादारी' आणि 'क्लासमेट' यासारखी उत्तम उदाहरणे आपल्यासमोर आहेतच.  आता अशाच एका मल्टिस्टारर सिनेमामध्ये भर घालण्यासाठी अभिनेत्री 'सई ताम्हणकर', 'पर्ण पेठे' आणि अभिनेता 'ललित प्रभाकर' सज्ज झाले आहेत.. "मिडीयम SPICY" विचित्र पण खमंग नावाच्या चित्रपटामध्ये 'सई ताम्हणकर', 'ललित प्रभाकर' आणि 'पर्ण पेठे' पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. 'लैंडमार्क फिल्मस' ची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन 'मोहित टाकळकर' करणार आहेत. 
 प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवल्यानंतर दिग्दर्शक 'मोहित टाकळकर' आता "मिडीयम SPICY" या चित्रपटातून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. 'दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट' अशा सुंदर ओळीसोबत सई ताम्हणकरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून पुणे आणि मुंबई या दोन शहरात या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. 
 "मिडीयम SPICY" हा एक भूमिका प्रधान चित्रपट असून 'इरावती कर्णिक' यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर अशी बहुगुणी कलाकारांची संगत मिळाल्यामुळे मोहित टाकळकर एका चांगल्या दर्जाच्या सिनेमाने सर्वांनाच आकर्षित करतील अशी आशा आहे. तर दुसर्‍या बाजूला सई, ललित आणि पडणं ही तिकडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar