सोनी – सरकारच्या लग्नाला शिवाचा नकार.

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी आणि शिवाच्या आयुष्यामध्ये अनेक घटना होऊन गेल्या ज्यांना प्रेक्षक देखील साक्षी होते... पण आता या गुरुवारी आणि शुक्रवारी मालिकेचा धम्माकेदार भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... सध्या मालिकेमध्ये सोनी आणि सरकारच्या लग्नाचा विषय आत्याबाईंमुळे पुन्हा चर्चेत आला आहे... सोनीचा या लग्नाला पहिल्यापासुनच नकार आहे आणि तसं तिने शिवाला सांगितले देखील आहे... आणि या विषयाला धरून सिध्दीचे देखील ठाम मत आहे जे तिने आत्याबाईंना कळवले आहे... पण, आता शिवा आत्याबाईंना काय सांगणार ? कसे सांगणार ? यावर सगळ्यांच्या नजरा होत्या. आजपर्यंत शिवाने आत्याबाईंचा कुठलाच शब्द खाली पडू दिला नाही. पण आता मात्र त्याच्या लाडक्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न असताना शिवा कसा शांत बसेल ? एकीकडे सोनी आणि सिद्धीचा विश्वास आणि दुसरीकडे आत्याबाईंची मागणी.. यामध्ये प्रत्येक भाऊ जसा आपल्या बहिणीच्या हिताचा विचार करेल तसेच अगदी शिवाने देखील केले आहे. आत्याबाईंना शिवाने सोनी – सरकारच्या लग्ंनास त्याचा नकार असल्याचे सांगितले आहे. शिवाच्या या अनपेक्षित निर्णयाने आत्याबाईंना नक्कीच धक्का बसला आहे ... शिवाचा हा निर्णय ऐकताच आत्याबाईंनी शिवावर बंदुक रोखली आहे... शिवाचा हा नकार त्याच्या जिवावर तर नाही ना बेतणार ? इतकेच नसून शिवाचा हा निर्णय मंगलला कळताच ती घरामध्ये वेगळाच राडा घालणार आहे... सिधीच्याच सांगण्यावरून शिवाने हा निर्णय घेतला आणि त्यामुळे शिवा आणि सिद्धीला मंगल घर सोडून जाण्यास सांगणार आहे ... 

 

 

 

   मालिकेमध्ये पुढे काय होणार ? मंगल आणि आत्याबाई मिळून कुठलं नव कारस्थान करणार ? सिद्धी शिवाच्या साथीने त्याला कशी सामोरी जाणार हे बघणे रंजक असणार आहे...  तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा या गुरुवारी - शुक्रवारी रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Tags

Read Next...


Popular News

Read something similar