उरी द सर्जिकल स्ट्राइक मध्ये मनोहर पर्रीकरांशी जुळती भूमिका साकारण्याचा अभिमान - योगेश सोमण

URI THE SURGICAL STRIKE POSTER

 How is the Josh...??? HIGH SIR ! या एका वाक्याने सोशल मीडिया तसेच अनेक नेत्यांच्या भाषणांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. "उरी : द सर्जिकल स्ट्राइक" या एका सत्यघटनेवर आधारित सिनेमातील हा डायलॉग प्रेक्षकांनी उचलून धरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास २४० कोटींची कमाई करत ब्लॉकबस्टर टॅग मिळवला. यावरूनच या सिनेमाला प्रेक्षकांनी किती प्रचंड प्रतिसाद दिला हे दिसून येते. या सिनेमात प्रमुख भूमिकेत 'विकी कौशल' याची व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.'आदित्य धर' दिग्दर्शित सर्जिकल स्ट्राइकवर भाष्य करणाऱ्या या सिनेमात नुकतेच निधन पावलेले 'मनोहर पर्रीकर' यांच्याशी मिळतीजुळती भूमिका साकारण्याची किमया मराठी अभिनेता 'योगेश सोमण' यांनी केली. पडद्यावर 'मनोहर पर्रिकर' यांचे ताकदवान आणि खंबीर व्यक्तिमत्व अभिनेते 'योगेश सोमण' यांनी मोठ्या जबाबदारीने साकारले. नुकतेच 'मनोहर पर्रीकर' यांचे निधन झाल्यानंतर या सिनेमातील त्यांची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरली. अभिनेते 'योगेश सोमण' यांनी देखील 'मनोहर पर्रीकर' यांना श्रद्धांजली वाहिली.

 चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल अभिनेते 'योगेश सोमण' म्हणाले की, "पर्रिकरांचे साधेपण आणि त्यांचे राहणीमान या सिनेमात जपण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या भूमिकेचे बारकावे जपून मेकअप केल्यानंतर आरशात चेहरा पाहिल्यावर एक वेगळीच भावना होती. एक संरक्षण मंत्री म्हणून सर्जिकल स्ट्राईक मधील त्यांची भूमिका आणि एक जबाबदार साक्षीदार असल्याची भूमिका साकारल्याचा मला अभिमान वाटतो."

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar