गणेशोत्सवानंतर नेहा शितोळेचा या उपक्रमात हातभार.

NEHA SHITOLE

गणेश उत्सव म्हटलं की सगळ्यांचा आवडता सण. मग त्यात वेगवेगळ्या मुर्त्यांची स्पर्धा ही चालूच असते. आपल्या मंडळाचा  राजा इतरांपेक्षा कसा वेगळा असेल याच हेतूने गणपतीच्या मुर्त्यांची उंची वाढवली जाते. यासाठी जास्तीजास्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या  जास्त बनवल्या जातात. नुकताच गणेशोउत्सव अगदी मोठ्या उत्साहात पार पडला.  गणपती जोपर्यंत मंडळात आहे, घरात  आहे तोपर्यंत त्याची पूजा केली जाते. मग....? 

 

 ज्याची अकरा दिवस मनोभावे पूजा करतो. तो आदर, ती भावना फक्त अकरा दिवसच असते  का ? गणपती विसर्जनानंतर संपूर्ण समुद्रकिनारी ह्याच मुर्त्या समुद्राच्या लाटेने बाहेर पडलेल्या असतात.  यामुळे गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारी होत असलेल्या प्रदुषणाचे काय? याकडे कोणीच लक्ष देत नाही.  ह्या प्रश्नाचे सामाजिक गांभीर्य ओळखून, बिगबॉस मराठी सीजन २ ची अंतिम स्पर्धक आणि संवेदनशील अभिनेत्री नेहा शितोळे हिने जुहू येथे समुद्र स़फाईचे कार्य केले.  

मुंबईतील सामाजिक संस्था अलर्ट सिटीजन फोरम, (रजि.) व नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र संयुक्तपणे द सोशल हूट यांच्या सहकार्याने जुहू येथे नुकतीच समुद्र किनारा सफाई मोहीम राबविण्यात आली होती, या मोहिमेत सहभागी होत नेहाने आपला महत्वपूर्ण हातभार लावला.

हेही वाचा : या कारणांमुळे 'गर्ल्स' चित्रपट २९ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित.

 याविषयी नेहा म्हणते कि, मला खूप महत्वाची वाटते हि गोष्ट फक्त गणपती विसर्जनानंतर नाही तर दर दिवशी ही मोहीम सातत्याने राबवली पाहिजे. अशा संस्थानमार्फत अशा मोहीम राबवल्या जात असतील तर त्यात  आपण सहभागी होऊन त्यांना पाठींबा द्यावा. हे समुद्र किनारे स्वच्छ ठेवणे हि आपली जबादारी आहे. कोणत्याही प्रकारचा कचरा, निर्माल्य वगैरे समुद्रात न टाकता कचरा कुंडीचा वापर करावा. पुढे ती म्हणते कि, हा सुद्धा वेगळा टास्क आहे माझ्यासाठी. प्रत्येकजण पर्यावरणाची काळजी घेऊ लागले तर गणेशोत्सव अजून सुसह्य होईल. 

 

लाखोंच्या संख्येने मुंबईतील जुहू बीच येथे घरगुती व सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन केले जाते. मात्र समुद्र मानवनिर्मीत वस्तू कधीच त्याच्या पोटात ठेवत नाही, विसर्जन केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, निर्माल्य आणि मुख्य म्हणजे पर्यटकांमार्फत आलेल्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाण समुद्र किनारे दरवर्षी प्रदूषित होत असतात! विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेले प्लास्टिक आणि निर्माल्य जमा करून महानगर पालिकेद्वारे योग्य ती विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला.

 

Tags

Read Next...


Featured News

Read something similar