या अभिनेत्रीने बनवला वर्तमानपत्रापासून ड्रेस. वाचा संपूर्ण बातमी.

लॉकडाऊनमुळे सर्व कलाकार  आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी स्वयंपाक करत आहे, कोणी व्यायाम करत आहे, कोणी आपल्या मुलाबाळांसह वेळ घालवत आहे, तर कोणीही बागेत आणि शेतात काम  करत आहे.

 

 

 

अभिनेत्री आणि डांसर कृतिका गायकवाड हिने देखील लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या एक नवीन शक्कल लढवली आहे. कृतिका गायकवाडने वर्तमानपत्रापासून एक ड्रेस बनवला आहे. कृतिकाने स्वतः वर्तमानपत्रापासून टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे. नंतर तो ड्रेस परिधान करून फोटोशूट देखील केले आहे. 

 

 

'क्वारंटाईनमधील प्रयोग' असं कॅप्शन देत तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. 'युवा डान्सिंग क्वीन' फेम कृतिकाचा हा नवीन ड्रेस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याआधी उशांचे आणि चादरींचे ड्रेस परिधान करण्याचे चॅलेंज व्हायरल झाले होते. 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar