'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील कोंडाजी फर्जंद अभिनेता 'आनंद काळे' दिसणार हॉलिवूड चित्रपटात.

ANAND KALE

 मराठी मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेला चेहरा म्हणजे अभिनेता आनंद काळे. अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भुमिका करत आनंद काळे यांनी आपली ओळख निर्माण केली. झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील कोंडाजीबाबांची भूमिका आनंदची विशेष गाजली. या मालिकेमुळे तो घराघरात पोहचला आणि प्रेक्षकांचा आवडताही झाला. आनंदच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तो लवकरच एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. 

 

 

 

 

 

हेही वाचा : लता दीदींच्या गीतांनी बहरलं 'ह.म.बने तु.म.बने' मालिकेतील कुटुंब

 

 

'रिमेम्बर अॅम्निशिया' असं आनंदच्या या चित्रपटाचे नाव आहे. भारतीय वंशाच्या रवी गोडसे याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅम्निशिया असलेल्या एका रुग्णाची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. एक भारतीय परदेशी डॉक्टर आपली स्मृती गेल्यानंतर भारतात परत येतो. इथे त्याला आलेल्या अनुभवांवर या चित्रपट बेतला आहे. या चित्रपटात आनंद यांनी समीर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. कोंडाजीबाबाच्या भूमिकेनंतर आनंदच्या पुढच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

 

 

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरु होतेय नवी मालिका ‘साता जल्माच्या गाठी…’

 

 

या चित्रपटाची प्रदर्शन तारीख अद्याप ठरली नसली तरी, नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये आनंद काळे यांच्यासोबत महेश मांजरेकर आणि श्रुती मराठे हे कलाकर मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. या चित्रपटातील बराचसा भाग कोल्हापूर व गोवा इथे चित्रित केला गेला आहे.

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar