एक घर बारा भानगडी एपिसोड ५ मध्ये आस्ताद काळे करणार बिग बॉस मराठीवर चर्चा.. 

EK GHAR BARA BHANGADI EPISODE 5

 बिग बॉस मराठी सीजन २ वर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा रंगत आहेत. मराठी बॉक्स ऑफिसच्या एक घर बारा भानगडी या शो मधून बिग बॉस मराठी सीजन २ वर मुद्देसूद आणि एका विशिष्ट पॅटर्नमध्ये चर्चा करण्यात येते. मराठी बॉक्स ऑफिसच्या यूट्यूब चैनल वर दर शनिवारी प्रदर्शित होणाऱ्या आणि आतापर्यंत झालेल्या ४ एपिसोडवर प्रेक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एक घर बारा भानगडीचा पहिला एपिसोड पुष्कर जोग याने होस्ट केला आणि या एपिसोडला युट्युबवर १,५५,०००+ व्यूज मिळाले. दुसऱ्या एपिसोडमध्ये होस्ट म्हणून सई लोकुर पाहायला मिळाली आणि तिला देखील प्रेक्षकांनी तितकेच पसंत केले आणि या एपिसोडला देखील १,५४,०००+ इतके व्यूज मिळाले. एपिसोड ३ आणि एपिसोड ४ मध्ये पुष्कर आणि सई या दोघांनी मिळून शो होस्ट केला आणि या दोन्ही एपिसोडला देखील प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. एक घर बारा भानगडी एपिसोड ३ ला २,८६,०००+ व्यूज तर एपिसोड ४ ला दिवसात १,०३,०००+ व्यूज मिळाले.

 आधी सांगितल्याप्रमाणे एक घर बारा भानगडी या शोमध्ये पुढे आणखीन काही सरप्राइजेस पाहायला मिळणार आहे आणि त्यापैकी एक सरप्राईज म्हणजे एक घर बारा भानगडी च्या एपिसोड ५ मध्ये होस्ट म्हणून बिग बॉस १ मधील स्पर्धक आणि एक रोख्ठोक वक्ता 'आस्ताद काळे' दिसणार आहे. या पाचव्या एपिसोडमध्ये, बिग बॉस मराठीच्या या आठवड्यातील घडामोडींवर आस्ताद काळे आपले मत मांडणार आहे. तर मग पाहायला विसरू नका 'एक घर बारा भानगडी' एपिसोड ५ उद्या संध्याकाळी पाच वाजता मराठी बॉक्स ऑफिसच्या यूट्यूब चॅनलवर. आणि अजून पर्यंत तुम्ही जर, एक घर बारा भानगडीचे ४ एपिसोडस् पाहिले नसतील तर नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
Read Next...


Featured News

Read something similar