अमृता आणि पुष्कर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे लंडनमधील शेअर केले खास फोटोज.

AMRUTA KHANVILKAR and PUSHKAR JOG

मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये ज्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे, ती म्हणजे अमृता खानविलकर. अमृता खानविलकर  सोशल मिडियावर जास्त ऍक्टिव्ह असते.  डेली रुटिंग बद्धल आणि चित्रपटांबद्दल  ती सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अपडेट्स करत असते. सध्या तिने तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंट वरून अभिनेता पुष्कर जोग सोबत लंडनमधील काही फोटोस शेअर केले आहेत. 

हेही वाचा : प्रथमेश परब होणार ‘टल्ली’. वाचा संपूर्ण बातमी.

अमृता आणि पुष्कर ह्या दोघांचा 'वेलडन बेबी' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  सध्या अमृता आणि पुष्कर या चित्रपटाच्या  शूटिंगसाठी व्यस्त आहेत. या शूटिंग दरम्यानचे काही फोटोस अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  अमृताच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे.  

 

 

हेही वाचा : स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत भावनिक वळण.

 

हेही वाचा : अभिनेता 'स्वप्नील जोशी' या चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका.

अमृता खानविलकर नेहमीच प्रत्येक ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते. मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबर अमृताने मालिका, डान्स रियालिटी शो तसेच खतरो के खिलाडी या रियालिटी शो मध्ये देखील काम केले आहे.  पुष्कर आणि अमृता यांच्यासह अभिनेत्री वंदना गुप्ते यादेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तसेच प्रियांका तन्वर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. पुष्करने अलीकडेच 'ती अँड ती' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र अमृताने ब-याच काळानंतर मराठी चित्रपटात पुन्हा एन्ट्री घेतली आहे. अमृता आणि पुष्कर ही नवी जोडी लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar