‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

Sarsenapati Hambirrao.

कोणत्याही चित्रपटाचा मुहूर्त म्हटलं की तो एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीच्या हस्ते करणे ही एक परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत लेखकदिग्दर्शकअभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी आगामी सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी एक आदर्श पायंडा निर्माण केलामुहूर्ताचा क्लॅप देण्याचा मान राज्याच्या विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर किपर्सव्यवस्थापक आणि कर्मचारी यांना देण्यात आला. ही अभूतपूर्व घटना राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला घडली.

 

हेही वाचा : सई ताम्हणकर करणार कतारमध्ये धुराळा.

शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्‍या मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर प्रविण तरडे घेऊन येत असलेल्या या भव्य चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला.

 

हेही वाचा : अतुल परचुरे घेऊन येणार 'अळीमिळी गुपचिळी' ....

सातारा जिल्ह्यातील साप गावात संपन्न झालेल्या या मंगलमय सोहळ्याला चित्रपटाचे लेखकदिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडेसंदीप रघुनाथराव मोहिते पाटीलधर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम हे तीन निर्माते तसेच  माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटीलपोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते पाटीलडीओपी महेश लिमये, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते अभिजीत भोसलेसिटी प्राइड चित्रपटगृह समूहाचे व्यवस्थापक सुगत थोरातक्रिएटिव्ह प्रोड्युसर रमेश परदेशीमार्केटिंग डायरेक्टर विनोद सातवकार्यकारी निर्माते विशाल चांदणेमिलिंद झांबरेतेजस गानू, मयूरेश दळवीअक्षय जोशीअजिंक्य शिंगारेपै. गणेश फणसेसूरज भिसेचेतन चव्हाणयोगेश टकलेश्रीहरी काळेवेदांग शिंदे, रणजीत ढगे पाटील, शेखर मोहिते पाटील, तुषार भामरे  यांच्यासह औरंगाबादनाशिकपुणे या शहरातील चित्रपटगृहांचे व्यवस्थापकडोअर किपर्सबुकिंग क्लार्कप्रोजेक्टर ऑपरेटर्स आणि चित्रपटाचे कलाकारतंत्रज्ञ उपस्थित होते.

हेही वाचा : हिंदी नृत्यदिग्दर्शक ओमकार शिंदेचे मराठीत 'प्रयोग पे प्रयोग'

सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतिहासिक विषय घेऊन आले आहेत. सरसेनापती हंबीरराव’ या अतिशय भव्यदिव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती संभाजी महाराजसरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच बहिर्जी नाईकसोयराबाईऔरंगजेबसंताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar