हि मराठी अभिनेत्री सहभागी होणार खतरों के खिलाडी १० मध्ये.

This Marathi Actress will be the part of Fear Factor Khatron Ke khiladi season 10.

खतरों के खिलाडीच्या १० व्या सिजनची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या वर्षी ह्या शो मध्ये कुणाची वर्णी लागणार? याबाबत अनेक सिलेब्सची नावं सध्या चर्चेत आहेत. युवराज सिंग, धर्मेश येलांडे, करन पटेल आणि कविता कौशिक या सिलेब्सना या शोसाठी विचारण्यात आल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत.

 

अश्यातच मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री या शोमध्ये सहभागी होत असल्याची बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. ह्या अभिनेत्रीचं नाव अमृता खानविलकर असून अमृता सध्या 'जिवलगा' मालिकेच्या शूट मध्ये व्यग्र आहे. तसेच ह्यावर्षी प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'वाजले कि बारा' ह्या सिनेमात देखील अमृता झळकणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी च्या १० व्या सिजनसाठी अमृताचा विचार करण्यात आला असून ह्या शोचं शूट ह्यावेळी बल्गेरिया मध्ये पार पडणार आहे. अभिनय, नृत्य याखेरीज अमृता तिच्या फिटनेस साठी देखील ओळखली जाते. त्यामुळे अमृता नक्कीच खतरों के खिलाडी १० मधील स्टंट निडरपणे पार पडेल ह्यात काही शंकाच नाही.

     

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar