धैर्यशील साकारणार तानाजी मालुसरेंच्या मावळ्याची भूमिका.. वाचा संपूर्ण माहिती

DHAIRYASHEEL TO PLAY TANAJI MALUSARE'S MAWALA IN TANAJI

 

 

 मराठी मालिका आणि सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसलेला अभिनेता धैर्यशील आता त्याच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित "तानाजी द अनसंग वारियर" हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील तानाजी मालुसरे यांच्या प्रमुख भूमिकेत 'अजय देवगण' तर सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत मराठी अभिनेता 'देवदत्त नागे' दिसणार आहेत. तर अभिनेता 'धैर्यशील' या सिनेमात तानाजी मालुसरे यांच्या सोबतच्या एका शूर मावळ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'एक तारा', 'लकी' यासारख्या मराठी सिनेमांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्यानंतर डायरेक्ट बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटाची संधी मिळाल्याबद्दल तो सध्या भलताच खुश आहे.

 

 

 

 

 

 आपली खुशी बोलून दाखवताना धैर्यशील म्हणाला की, "कोणत्याही अभिनेत्यासाठी बॉलीवूड सुपरस्टार सोबत काम करणे स्वप्नवत असतं. अभिनयात पदार्पण केल्यानंतर मी मराठी नाटक, मालिका, लघुपट आणि व्यावसायिक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारत होतो. मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळावी ही माझी इच्छा होती आणि आता तानाजी चित्रपटाच्या निमित्ताने ती पूर्ण होतेय." चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, "आता मी माझ्या भूमिकेबद्दल अधिक काही सांगू शकत नाही. माझ्या भूमिकेसाठी मी कसून मेहनत घेतोय. मला मिळालेल्या या मोठ्या संधीचे सोने करायचे आहे."

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar