गल्ली बॉयच्या पहिल्या आठवड्याच्या कमाईत सर्वाधिक वाटा मुंबई महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांचा

GULLY BOY POSTER
 व्हॅलेन्टाईन्स डे च्या दिवशी प्रदर्शित झालेल्या "गल्ली बॉय" या सिनेमाने पहिल्या आठवड्यात चांगला गल्ला जमवला आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमा "आनंदी गोपाळ" देखील त्याच्या समोर उभा ठाकला असल्यामुळे या सिनेमाची कमाई कमी होईल असा अंदाज होता. परंतु सगळे अंदाज चुकीचा ठरवत या सिनेमाने मुंबई, महाराष्ट्र या मराठी भाषिक विभागात जबरदस्त कमाई केली आहे. त्याच्या समोर उभा ठाकलेल्या "आनंदी गोपाळ" या मराठी सिनेमाने तितकीच दमदार कमाई केली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा हा सिनेमा म्हणजे मुंबईतील धारावी भागात घडणारी कथा असल्यामुळे मुंबईतील प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे असे दिसते. "गल्ली बॉय" सिनेमाची दिवसागणिक कमाई खालीलप्रमाणे :-
दिवस १ - १९.२५ कोटी
दिवस २ - १२.७५ कोटी
दिवस ३ - १८.५० कोटी
दिवस ४ - २१.०० कोटी
दिवस ५ - ८.५० कोटी
दिवस ६ -  ८.०० कोटी
दिवस ७ - ६.५० कोटी
एकूण पहिल्या आठवड्याची कमाई - ९४.५० कोटी*

 या एकूण भारतातील कमाई पैकी २९ कोटींची कमाई फक्त मुंबई आणि महाराष्ट्र या भागातून केली आहे. याचाच अर्थ "गल्ली बॉय" सिनेमाची जवळपास ३२% कमाई मराठी प्रेक्षकांच्या भागातून झाले आहे. कमाईची ही टक्केवारी सिनेमाच्या संपूर्ण भारतातील कमाईपैकी दुसऱ्या कुठल्याही राज्यातील कमाईच्या टक्केवारीच्या तुलनेने सर्वाधिक आहे. गेल्याच महिन्यात 'रणवीर सिंगच्या "सिंबा" चित्रपटाने मुंबई, महाराष्ट्र या भागात तुफान गल्ला कमावला होता. त्या सिनेमाच्या कमाईच्या टक्केवारीतही जवळपास ३८% वाटा मुंबई महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा होता. 


 "सिंबा" या सिनेमात अनेक मराठी कलाकारांच्या भरणा होता आणि त्यामुळेच मराठी प्रेक्षकांनी या सिनेमाला गर्दी केली होती. त्याचप्रमाणे "गल्ली बॉय" या सिनेमात देखील 'अमृता सुभाष' हि मराठी अभिनेत्री 'रणवीर सिंग' च्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळाली. मराठी कलाकारांच्या उपस्थितीमुळे हिंदी सिनेमाच्या कमाईत भर पडत असेल तर ही एक चांगलीच गोष्ट आहे परंतु यामुळे मराठी चित्रपटाला नुकसान होऊ नये. मराठी सिनेमा "आनंदी गोपाळ" च्या बाबतीत तरी असे काही घडले नाही आणि हा सिनेमा सुद्धा सुपरहिट ठरण्याच्या वाटेवर आहे, यापेक्षा चांगली बाब दुसरी कोणती नसावी.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar