भरत जाधववर १ लाख ८० हजाराची उधारी... वाचा सविस्तर.

BHARAT JADHAV

जत्रा , खबरदार, श्रीमंत दामोदरपंत, उलाढाल अशा गाजलेल्या चित्रपटांमधून  भरत जाधवने सगळ्यांनाच खळखळून हसवले आहे. प्रत्येक नवनवीन चित्रपटांमधून भरत जाधवने  आपल्या अभिनयाची जबाबदारी  जोखपणे  पार पाडलीय. पण आता ह्याच लाडक्या  अभिनेत्यावर १ लाख ८०  हजाराची उधारी आहे. हो तुम्ही ऐकताय ते खरं आहे. 
 
        
 
 
 
सगळ्यांचे विघ्न दूर करणारं आराध्य दैवत म्हणजे  गणपती. पण या गणपतीमुळेच भरत जाधववर उधारीचे विघ्न आले आहे.  बाप्पामुळे भरत जाधववर आलेले विघ्न दूर कसे होणार? या अडचणींचा  भरत जाधव कसा सामना करणार ? या  बाप्पाभोवती फिरणारी कथा "आप्पा आणि बाप्पा"  या  आगामी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या  चित्रपटाचा दमदार ट्रेलर देखील लॉंच करण्यात आला आहे.
 
 
 
 चित्रपटाचा ट्रेलर पाहता या चित्रपटात भरतने गोविंद कुलकर्णी नावाची  भूमिका साकारली आहे. गोविंद कुलकर्णी हा अगदी साध्या, मध्यमवर्गीय घरातला व्यक्ती आहे. गोविंदला त्याच्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा आहेत. पण काही आर्थिक गोष्टींमुळे त्याला पूर्ण करता येत नाही. गोविंद कुलकर्णीने त्याच्या घरी  गणपती बसवण्याचा निर्णय घेतला   आहे. पण गणपतीचा खर्च करता करता गोविंद कुलकर्णीवर १ लाख ८० हजाराची उधारी होते. या सगळ्या अडचणींमधून गोविंद कसा मार्ग काढणारं ? कोणाची मदत घेणार ? त्याचं हे कर्ज फेडलं जाणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे ११ ऑक्टोबरला मिळणार आहे.   
 
 
 
 
गरिमा धीर आणि जलज धीर निर्मित,  गरिमा प्रोडक्शन्स प्रस्तुत असलेल्या 'सन ऑफ सरदार' आणि 'अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा 'आप्पा आणि बाप्पा' हा पहिलाच मराठी चित्रपट ११ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तसेच भरत जाधव सोबत  सुबोध भावे,  दिलीप प्रभावळकर , संपदा कुलकर्णी , शिवानी रांगोळे, आणि उमेश जगताप आदि कलाकार देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar