गूढकथेच्या लेखणीला अल्पविराम. गूढकथाकार रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन.

रत्नाकर मतकरी

ज्येष्ठ लेखक, चित्रकार, गूढकथाकार   आणि नाटककार "रत्नाकर मतकरी" यांचे रविवारी रात्री 12 वाजता निधन झाले. त्यांचे निधन हे कोरोनामुळे झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. रत्नाकर मतकरी यांच्या जाण्यान कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.  मृत्यूसमयी ते ८१  वर्षांचे होते.  काही दिवसांपूर्वी मतकरी यांना थोडा थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी कोरोनाची चाचणी करण्यात आली. ही चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथेच त्यांचं देहावसान झालं.

 

 

 

रत्नाकर मतकरी यांची  1955  मध्ये , वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची 'वेडी माणसं' ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. मतकरी यांनी आपल्या कारकिर्दीत लोककथा ७८', 'दुभंग', 'अश्वमेध', 'माझं काय चुकलं?', 'जावई माझा भला', 'चार दिवस प्रेमाचे', 'घर तिघांचं हवं', 'खोल खोल पाणी', 'इंदिरा ', आणि इतर अनेक नाटके लिहिली. तसेच अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या लहान मुलांच्या, तसंच ‘आरण्यक’ या मतकरींच्या नाटकांनी रंगभूमीवर नाट्यरसिकांची  मन जिंकली.  

 

 

तर मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ 'माझे रंगप्रयोग' अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. 'गहीरे पाणी', 'अश्वमेध', 'बेरीज वजाबाकी' या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना मिळाला आहे.

 

 

रत्नाकर मतकरी यांना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य अकॅडमी  या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar