मराठी गाणी गाताना अभिमान वाटतो- जावेद अली...

JAVED ALI FEELS PROUD ON MARATHI SONGS

 

 
 भारतीय संगीत विश्वामधील घडामोडींमध्ये मराठी संगीताचा नेहमीच दबदबा राहिला आहे. पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या महान कलाकारांना संगीत क्षेत्रातील कार्यासाठी भारतरत्न देखील मिळाला. अनेक मराठी गायकांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणे राहिली आणि तेथे की मोठे नाव कमावले आहे. तर याउलट म्हणजे अनेक हिंदी सिनेमासृष्टीतील गायकांनी देखील मराठीमध्ये काम केले आहे. बप्पी लहरी, सोनू निगम, मिका सिंग आणि अशी बरीच नावे यामध्ये घेता येतील. यामध्ये आणखी एक नाव नुसतेच समाविष्ट झाले आहे ते म्हणजे बॉलीवूड गायक 'जावेद अली' यांचे.
 
 
 
 
 
Related image
 
'व्हाट्सअप लव' या आगामी मराठी सिनेमामध्ये जावेद अली यांनी गाणे गायले आहे. या सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्यात बोलताना ते म्हणाले की, "मी महाराष्ट्रात राहतो आणि मुंबई माझी कर्मभूमी आहे. मी दिल्लीचा असलो तरी अनेक कलाकारांना मोठे करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महान गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकतच मी मोठा झालो. मंगेशकर कुटुंबाच्या संगीत साधनेवर माझा विश्वास आहे. म्हणूनच मराठी गाणं गाण्यासाठी बोलवले तेव्हा मी खूप खुश होतो. व्हाट्सअप लव या चित्रपटात मी 'शोना रे' हे सोलो आणि 'जवळ ये ना जरा' श्रेया घोषाल सोबत ड्युएट् गाणे गायले या सिनेमात आशाताईंनी देखील एक गाणे गायले आहे म्हणून चित्रपटाच्या संगीताबद्दल मला खूपया सिनेमात आशाताईंनी देखील एक गाणे गायले आहे म्हणून चित्रपटाच्या संगीताबद्दल मला खूप उत्सुकता आहे."

Read Next...


Featured News

Read something similar