मेकअप सिनेमात रिंकू राजगुरु सोबत झळकणार हे ३ कलाकार.. वाचा संपूर्ण बातमी..

RINKU RAJGURU IN MAKEUP TEASER

 


 "सैराट" आणि "कागर" या दोन सिनेमाच्या यशानंतर आपल्या सर्वांची लाडके अभिनेत्री 'रिंकू राजगुरु' तिचा तिसरा सिनेमा घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे "मेकअप". या सिनेमाचा पोस्टर आणि टीचर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आतापर्यंतच्या दोन्ही सिनेमात गावाकडील मुलगी साकारल्यानंतर रिंकू राजगुरु या सिनेमात एक मॉर्डन आणि बिंदास बोलणारी मुलगी साकारणार आहे. दारूच्या नशेत बडबणाऱ्या रिंकू राजगुरूचा टीझर देखील प्रेक्षकांना अचंबित करून गेला. मध्यवर्ती भूमिकेत जरी रिंकू राजगुरू असली तरी मेकअप या सिनेमात आणखीन तीन पुरुष कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
 'रात्रीस खेळ चाले २' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील पाटणकर ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता 'अधिश पायगुडे' हा "मेकअप" या सिनेमात रिंकू राजगुरु सोबत दिसणार आहे. तर 'घाडगे अँड सून' या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतील कलाकार चिन्मय उदगीरकर देखील मेकअप या सिनेमात एका प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त आणखीन एक कलाकार या सिनेमात झळकणार आहे ज्याचे नाव आहे 'संकेत मोरे'. संकेत मोरे यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर मेकअप सिनेमाच्या शूटवरील फोटो पोस्ट करत ही बातमी सर्वांना कळविली. 'गणेश पंडित' यांनी दिग्दर्शित केलेल्या मेकअप या सिनेमाबद्दल आणखीन बरेचसे सरप्राईज येणे बाकी आहे तर वाट पाहूया या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आणि अर्थातच ट्रेलरची.Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar